ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांसाठी स्वतंत्र सॅनिटायझेशन टेनल - pune corona update

पोलीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा वेळी त्यांचा अनेक नागरिकांशी संपर्क येत होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांचे सॅनिटायझेशन होणे गरजेचे होते. यामुळे पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टेनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून आत प्रवेश करताच सॅनिटायझेशन होईल.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांसाठी स्वतंत्र सॅनिटायझेशन टेनल

author img

By

Published : Apr 15, 2020, 9:02 PM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिवसरात्र रस्त्यावर आपले कर्तव्य बजावत आहेत. अशा वेळी त्यांचा अनेक नागरिकांशी संपर्क येत होता. त्यामुळे पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांचे सॅनिटायझेशन होणे गरजेचे होते. यामुळे पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझेशन टेनल बसविण्यात आले आहे. जेणेकरून आत प्रवेश करताच सॅनिटायझेशन होईल.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा वेळी डॉक्टर, आरोग्य आणि पोलीस कर्मचारी हे आपले कर्तव्य बजावत आहेत. परंतु, पोलीस रस्त्यावर उतरून काम करत असताना अनेकांवर कारवाई करतात. त्यांचा थेट रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांशी संपर्क येत होता. त्यामुळे पोलीस कोरोनापासून असुरक्षित आहेत, त्यांच्या मनात ही भावना कुठेतरी निर्माण होत होती. त्यामुळे शहरातील सांगवीसह इतर पोलीस ठाण्यांमध्ये सॅनिटायझेशन टेनल बसविण्यात आले आहेत.

यामुळे पोलीस तर सुरक्षित आहेत, पण तक्रार दाखल करण्यासाठी येणारे नागरिकदेखील सुरक्षित असतील. कारण याच टेनलमधून तक्रारदारांना पोलीस ठाण्यात प्रवेश करावा लागतो. जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या पोलिसांचे कोरोनापासून संरक्षण होणं नक्कीच गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.