ETV Bharat / state

बारामतीत कोरोना वाढला; जेष्ठ नगरसेवक गुजर यांनी आरोग्य व्यवस्थेबाबत दिली 'ही' माहिती - Corporator Kiran Gujar Corona situation information

मागील वर्षभरापासून बारामतीतील कोणताही कोरोनाबाधित उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी बारामती नगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर स्वतःच्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता अहोरात्र बारामतीकरांची सेवा करत आहेत. सध्या बारामतीत वाढत्या कोरोना संदर्भात गुजर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी यांनी चर्चा केली.

Corporator Kiran Gujar Corona situation information
नगरसेवक किरण गुजर कोरोना परिस्थिती माहिती
author img

By

Published : Apr 19, 2021, 6:51 PM IST

पुणे - मागील वर्षभरापासून बारामतीतील कोणताही कोरोनाबाधित उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी बारामती नगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक किरण गुजर स्वतःच्या आरोग्याची कोणतीही तमा न बाळगता अहोरात्र बारामतीकरांची सेवा करत आहेत. वयाची साठी ओलांडलेले गुजर कोरोना काळात तरुणांना लाजवेल असे काम करत आहेत. सध्या बारामतीत वाढत्या कोरोना संदर्भात गुजर यांच्याशी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी यांनी चर्चा केली.

माहिती देताना जेष्ठ नगरसेवक किरण गुजर

हेही वाचा - मावळ : प्रेम संबंधाच्या संशयावरून वडिलानेच ट्रकखाली झोपवून केली मुलींची हत्या

पुण्यापाठोपाठ बारामती शहर देखील कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. बारामती शहरासह ग्रामीण भागात कोरोना संक्रमितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज ३०० हून अधिक बाधित आढळून येत आहेत. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी बारामतीतील प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, याच वेळी एकही बाधित उपचारापासून वंचित राहणार नाही. यासाठी देखील रात्रंदिवस प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येक बाधिताला मिळतो बेड

बारामतीतील तीन शासकीय रुग्णालय व कोविड केअर सेंटर मार्फत कोरोना बाधितांवर उपचार केले जात आहेत. शहरातील सिल्वर जुबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेडची क्षमता असताना देखील या ठिकाणी दुप्पट रुग्णांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयात १९ व्हेंटिलेटर बेडची सोय उपलब्ध आहे. तसेच, याच रुग्णालयाच्या मार्फत चालवल्या जाणाऱ्या एमआयडीसी येथील नर्सिंग होम येथे अवघ्या पाच दिवसांत ७६ ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच, रुई ग्रामीण रुग्णालयात कोरोनाबाधितांसाठी ३० ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. याशिवाय बारामती शहरातील २८ खासगी रुग्णालय बाधितांसाठी कार्यरत असून, या रुग्णालयांमध्ये एकूण तेराशे बेड उपलब्ध असून पैकी ४३० ऑक्सिजन बेड आहेत, अशी माहिती गुजर यांनी दिली.

वर्गवारीनुसार उपचार

कोरोना असल्याचे आढळून आल्यानंतर रुग्णांची वर्गवारी करून त्यांना दाखल केले जात आहे. यामध्ये सौम्य, मध्यम व गंभीर अशी वर्गवारी करून उपजिल्हा रुग्णालय, नर्सिंग होम, रुई ग्रामीण रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दाखल केले जात आहे. ज्या रुग्णांचा स्कोर पाचपेक्षा अधिक असेल, त्या रुग्णांना शासकीय उपजिल्हा रुग्णालयात, तर पाचपेक्षा कमी स्कोर असणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. तर, काही रुग्णांचे नातेवाईक स्वतःच्या पसंतीने खासगी रुग्णालयातही उपचार घेत आहेत.

आठ कोविड केअर सेंटर सुरू

बारामतीत सध्या दोन शासकीय व येथील नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने सहा कोविड केअर सेंटर कार्यरत आहेत. शासनाच्या वतीने सुरू असणाऱ्या माळेगाव येथील सेंटरमध्ये ३०० एमआयडीसी येथील वैद्यकीय महाविद्यालयात २२५ बेडची सोय आहे. तर, नटराजच्या वतीने सुरू असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह, तारांगण महिला वसतिगृह, पुण्यश्लोक अहिल्यादेवी वसतिगृह, तुळजाराम चतूरचंद महाविद्यालयातील वसतिगृह, विद्या प्रतिष्ठान येथील वसतिगृह या ठिकाणी एकूण ९०० बेडची सोय करण्यात आली आहे. बारामती शहरात कोरोना संक्रमित रुग्णाला उत्तम सुविधा मिळत असल्याने बारामतीसह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, सासवड, जेजुरी, दौंड, इंदापूर आदी भागातून नागरिकांचा ओढा मोठ्या प्रमाणात बारामतीकडे आहे, अशी माहिती गुजर यांनी दिली.

डॉक्टर करत आहेत अहोरात्र काम

शासकीय उपजिल्हा रुग्णालयात केवळ शंभर बेडची क्षमता असतानाही तब्बल २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांच्या सेवेसाठी केवळ आठ डॉक्टर अहोरात्र सेवा बजावत आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, डॉ. जगताप, रुई ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सुनील दराडे यांच्यासह सहकारी डॉक्टर यांच्याकडून एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जात आहे, अशी माहिती गुजर यांनी दिली.

हेही वाचा - पुरंदरला रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा; माजी आमदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.