ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये मॉलच्या इमारतीवरून पडल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू - पिंपरी-चिंचवड न्यूज

प्रवीण हा मोशीतील स्पाईन मॉलच्या पहिल्या मजल्यावर ड्युटी करीत होता. पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास तो इमारतीवरून पडल्याने त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Security guard killed after falling from mall building in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये मॉलच्या इमारतीवरून पडल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू
author img

By

Published : Aug 13, 2021, 1:02 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - येथे मॉलच्या इमारतीवरून पडल्याने सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवीण चंद्रकांत जाचक (28) असे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.

उपचारादरम्यान मृत्यू -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण हा मोशीतील स्पाईन मॉलच्या पहिल्या मजल्यावर ड्युटी करीत होता. पहाटे चार ते पाच वाजताच्या सुमारास तो इमारतीवरून पडल्याने त्याच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात होतो. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - पुण्यात यंदाही सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानेच; मंडळांना ऑनलाईन परवाने

हेही वाचा - झिका व्हायरसचा धोका टाळण्यासाठी पुण्यात 'या' गावात वाटले कंडोम, लैंगिक संबंध टाळाण्याचाही दिला सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.