ETV Bharat / state

रेल्वे स्थानकासह मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर उद्यापासून होणार स्क्रीनिंग - दीपक म्हैसेकर - कोरोनाग्रस्त पुणे

पुणे जिल्ह्यात पूर्वी १८ कोरोनाग्रस्त होते. त्यामध्ये एकाची वाढ झाली आहे. पुण्यात ८, तर ११ पिंपरी-चिंचवडमध्ये, असे मिळून १९ कोरोनाग्रस्त आहेत. तसेच पुण्यात सर्वेक्षण करत आहोत. १ हजार २३५ जणांचे स्क्रींनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी १० जणांना नायडू रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, असे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
author img

By

Published : Mar 19, 2020, 6:12 PM IST

Updated : Mar 19, 2020, 7:13 PM IST

पुणे - रेल्वे स्थानक, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, विमानतळ आणि जुना मुंबई पुणे महामार्ग यावर थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रीनिंग करण्यात येईल. प्रत्येक प्रवाशाला तपासून काही लक्षणे आढळल्यास त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

आयुक्त म्हैसेकर म्हणाले, विपणन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जीवनावश्यक वस्तू डाळी, धान्य, दूध यांचा तुटवडा होणार नाही, याची दक्षता घ्यायला सांगितले. तसेच एन-९५ मास्क किंवा सर्जिकल मास्क उपलब्ध करून देण्याबाबत देखील सूचना दिल्या. सर्व वैद्यकीय अधिष्ठातांबरोबर चर्चा केली. सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयाच्या कामात सुसुत्रता ठेवण्याच्या सूचना दिल्या. ज्या शस्त्रक्रिया तातडीच्या नाही अशा सर्व शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात येतील, अशा मार्गदर्शक सूचना आम्ही केल्या आहेत. मात्र, त्यामध्ये डॉक्टरांचा निर्णय महत्वाचा राहील. ही बंदी नसून फक्त मार्गदर्शक सूचना आहेत, असेही त्यांनी सांगितले.

टूर अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांसोबत देखील चर्चा केली आहे. त्यांच्याकडून आम्हाला प्रवास करणाऱ्यांची माहिती मिळत आहे. यामध्ये जे कोरोनाबाधित देश आहेत त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती वेगळी करून देण्यास त्यांना सांगण्यात आले. तसेच दररोज होणाऱ्या २ हजार ६०९ बसेस फेऱ्यांपैकी १ हजार २४५ फेऱ्या रद्द केल्या आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे, असेही ते म्हणाले.

जिल्ह्यात पूर्वी १८ कोरोनाग्रस्त होते. त्यामध्ये एकाची वाढ झाली आहे. पुण्यात ८, तर ११ पिंपरी-चिंचवडमध्ये, असे मिळून १९ कोरोनाग्रस्त आहेत. तसेच पुण्यात सर्वेक्षण करत आहोत. १ हजार २३५ जणांचे स्क्रींनिंग करण्यात आले आहे. त्यापैकी १० जणांना नायडू रुग्णालयात पाठवण्यात आले आहे, असे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

Last Updated : Mar 19, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.