ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : चिमुकले हात साकारताहेत कोरोना योद्धारुपी इको फ्रेंडली गणेश मूर्ती - गणेश मुर्ती बातमी

शाडूच्या मातीचे इको फ्रेंडली असलेले हे रुप विद्यार्थी आपल्या चिमुकल्या हाताने अलगद साकारताना दिसत आहेत. कोरोना महामारीने सर्वसामान्य नागरिकांसह उत्सव देखील बदलून टाकले आहेत.

eco friendly ganesh statue
चिमुकले हात साकारतायेत कोरोना योद्धारुपी इको फ्रेंडली गणेश मूर्ती
author img

By

Published : Aug 4, 2020, 5:05 PM IST

पुणे - सध्या जगभरात कोरोनाचे संकट आहे. भारतातही कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. त्यासाठी शासनाकडून अटी आणि शर्थी लागू करण्यात आल्या आहेत. अगदी मोजक्याच गणेशभक्तांच्या उपस्थितीत बाप्पाचे आगमन होणार आहे. नेहमी बाप्पांच्या दर्शनासाठी गजबजलेली गर्दी आता सोशल डिस्टन्सिंग पाळणार आहे. दरम्यान, यावर्षीचे बाप्पाचे रुप वेगळे असणार आहे. मावळ परिसरातील शिवणे येथील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी शाळा बंद असूनही शाळेच्या मैदानात विविध कोरोना योद्धेरुपी गणपती बाप्पा साकार करण्यात व्यस्त आहेत.

चिमुकले हात साकारतायेत कोरोना योद्धारुपी इको फ्रेंडली गणेश मूर्ती

शाडूच्या मातीचे इको फ्रेंडली असलेले हे रुप विद्यार्थी आपल्या चिमुकल्या हाताने अलगद साकारताना दिसत आहेत. कोरोना महामारीने सर्वसामान्य नागरिकांसह उत्सवदेखील बदलून टाकले आहेत. नियम, अटी आणि शर्तींच्या अधीन राहून इथून पुढचे सण आणि उत्सव साजरे करावे लागणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात विविधरुपी इको फ्रेंडली बाप्पा पाहायला मिळत आहेत. यात, कोरोना महामारीचा मुकाबला करणारे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, ऑन ड्युटी 24 तास असलेले पोलीस, बळीराजा शेतकरी, भाजी विक्रेता आणि कोरोनाची प्रत्येक बातमी नागरिकांपर्यंत पोहोचवणारा पत्रकार आणि कॅमेरामन ही सर्व रुपे आता गणपतीच्या मूर्तींमध्ये दिसणार आहेत. चिमुकले हात सुबक आणि सुरेख मूर्ती तयार करत आहेत. यासाठी त्यांचे मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव यांची मोलाची साथ लाभली असून, कला शिक्षक अतिष थोरात यांनी मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिवले येथील माध्यमिक विद्यालयात शाडूच्या मातीपासून इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवल्या जातात. कोरोना संकटामुळे यावर्षी खंड पडणार असे वाटत असताना मैदानात सोशल डिस्टन्सिंग पाळत काही वर्षांपासून सुरू असलेली मूर्ती बनवण्याची परंपरा सुरू ठेवण्याचा शर्थीचा प्रयत्न शिक्षकांनी केला आहे. मुलांनी देखील मूर्तींमध्ये जीव ओतून गणपती बाप्पांची विविध रुपे साकारली आहेत. या चिमुकल्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी देशातील हे कोरोनाचा संकट दूर व्हावे असे साकडे बाप्पाकडे घातले आहे. तसेच देश कोरोनामुक्त व्हावा अशी मागणी गणरायाचरणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.