पुणे : कोरोनाच्या पश्वभूमीवर सुमारे दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. ग्रामीण भागात 5 वी ते बारावी आणि शहरी भागात 8 वी ते 12 अशी शाळा सुरू होणार आहेत. पुण्यातील राजीव गांधी ई लर्निंग स्कुलमध्ये विदूषकांच्याहस्ते चॉकलेट आणि गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विदूषकांच्या हस्ते स्वागत होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांच्या चेहेऱ्यावर आनंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला आणि तेव्हापासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी हे प्रत्यक्ष शाळांपासून दुरावले होते. पण पुणे शहरात तब्बल दीड वर्षांहून अधिक काळापासून शाळा बंद होत्या. आज विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.
ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच शिक्षण बरं - विद्यार्थी
![पुण्यातील शाळेत विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-rajiv-gandhi-school-swagat-avb-mh10021_04102021094757_0410f_1633321077_937.jpg)
![पुण्यातील शाळेत विद्यार्थ्यांचे चॉकलेट देऊन स्वागत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-02-rajiv-gandhi-school-swagat-avb-mh10021_04102021094757_0410f_1633321077_13.jpg)
![े](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-school-open-5th-to-8th-avb-mh10021_04102021083219_0410f_1633316539_759.jpg)
![पुण्यातील शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-school-open-5th-to-8th-avb-mh10021_04102021083219_0410f_1633316539_1060.jpg)
औक्षण करून, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत
जवळपास दीड वर्षानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात शाळांची घंटा वाजली आहे. विद्यार्थ्यांचे औक्षण करून आणि चॉकलेट देऊन शाळेत स्वागत करण्यात आले. पुण्यातील श्री शिवाजी मराठा हायस्कूल येथे आज विद्यार्थ्यांचे औक्षण करून तसेच चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय समोर आला आणि तेव्हापासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थी हे प्रत्यक्ष शाळांपासून दुरावले होते. पण पुणे शहरात तब्बल दीड वर्षांहून अधिक काळापासून शाळा बंद होत्या. आज विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद पाहायला मिळालं.
हेही वाचा - पेंडोरा पेपर्समध्ये सचिन तेंडूृलकर आणि शकीरासह जगभरातील नेते, अभिनेत्यांचा समावेश