ETV Bharat / state

Senate Election : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर भाजपचे वर्चस्व.. फडणवीसांच्या बंधुंचाही विजय - Deputy Chief Minister Devendra Fadwanis

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे 10 प्रवर्गातील निकाल जाहीर ( Savitribai Phule Pune University Senate Election Election ) करण्यात आला असून भाजपा पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 23, 2022, 6:23 PM IST

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेचे 10 प्रवर्गातील निकाल जाहीर ( Savitribai Phule Pune University Senate Election Election ) करण्यात आला असून भाजपा पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाचे 9 उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस ( Deputy Chief Minister Devendra Fadwanis ) यांचे बंधू प्रसन्नजीत फडवणीस यांचाही विजय झालेला आहे. दहा जागांपैकी नऊ जागांवर भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचाने बाजी मारत विद्यापीठ अधीसभा सदस्याच्या निवडणुकीत वर्चस्व निर्माण केलेले आहे.

निवडणुकीचा निकाल - अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल पाखरे १३ हजार ५१२ मतांनी निवडून आले. अनुसूचित जमाती प्रवर्गातून १३ हजार ९९५ मते मिळवत गणेश नांगरे निवडून आले. निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती) भटक्या जमाती या जागेवर डॉ.विजय सोनवणे हे १४ हजार १०१ मतांनी निवडून आले आहे. इतर मागास वर्ग प्रवर्गातून सचिन गोर्डे पाटील हे १३ हजार ३४२ मतांनी निवडून आले आहेत. तसेच महिला प्रवर्गातून बागेश्री मंठाळकर १५ हजार ६४९ मतांनी विजयी झाल्या आहेत. खुल्या प्रवर्गातून प्रसेनजीत फडणवीस ४ हजार ४४७, सागर वैद्य ३ हजार ७११ , युवराज नरवडे ३ हजार २८३, दादाभाऊ शिनलकर २ हजार ५११ तर बाकेराव बस्ते २ हजार २३० मते मिळवत विजयी झाले.

नियोजनबद्ध निवडणुक प्रक्रिया - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभेच्या दहा जागांसाठीच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. सकाळी साडेआठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. विद्यापीठातील तीनशेहून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावर काम करत होते. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधीही हजर होते. ५०० सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही, संकेतस्थळावर थेट प्रक्षेपण आदींसह नियोजनबध्द पद्धतीने ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

विजयी उमेदवारांचा सत्कार - दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, विशेष कार्याधिकारी प्रमोद भडकवाडे, निवडणूक अधिकारी डॉ.वैशाली साकोरे , ज्ञानेश्वर साळुंखे, प्रदीप कोळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.