पुणे - तलवार म्हणजे पराक्रम तलवार म्हणजे सौंदर्य! प्रत्येकाला तलवारीचे आकर्षक असते. पुण्यातील सत्यजित वैद्य ( Satyajit Vaidya Pune ) या तरुणांला देखील लहानपणापासून तलवारीचे आकर्षक होते. याच आकर्षणातून त्याने तलवारीचा अभ्यास करून अतिशय आकर्षक तलवार साकारली आहे. विशेष म्हणजे अशी तलवार पहिल्यांदाच बनविण्यात आली आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती ( Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati ) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला साजेल, अशी उत्कृष्ट लेहरिया पोलादापासून तयार करण्यात ( Sword made of steel ) आलेली तलवार भेट म्हणून त्याने दिली आहे. अशा प्रकारच्या विविध तलवारी सत्यजितने शरद पवार, नरेंद्र मोदी, अजीत पवार, उदयनराजे भोसले, अमोल कोल्हे आदींना भेट स्वरूपात दिल्या आहे. तसेच पावनखिंड चित्रपटात देखील सत्यजित यांनी बनवलेली तलवार वापरली आहे.
...म्हणून तलवार तयार करण्याकडे ओढा निर्माण झाला : छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पराक्रम आणि तलवार या विषयी देशभरात पूर्वीपासून आजतागायत प्रत्येक लहानथोरापासून प्रत्येकाच्या रक्तात भिनलेला विषय आहे, तसाच तो माझ्यात ही होताच. प्रत्येकास वाटते माझ्याकडे सुद्धा तलवार हवी, लहानपणी मलाही तसेच वाटायचे, घरच्यांनी खेळण्यातील तलवार माझ्या हातात देवून माझी ती हौस पुरवली देखील, परंतु जसजसे वय वाढत गेल तस तसे ती खेळण्यातील एका विशिष्ट बनावटीची तलवार नकोशी वाटायला लागली. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या हातात जशी आहे, तशीच आपल्याकडे हवी अस वाटायला लागल, मग येथून सर्व प्रवास चालू झाला. स्वतः जवळ कोणतेही अवजारे नसताना आपण ती स्वतःच बनवू हा विचार केला. नुकतेच तेव्हा आमच्या घरात फर्नीचरचे काम चालू होते, मग त्याच सुतारकामासाठी आलेल्या कारागिर करावी. मी उरलेल्या लाकडी प्लायवुडवर तलवारीचे स्केच काढून त्याच्याकडून ते कापुन घेतले. तेव्हा आनंद गगनात मावेना. पण तो आनंद काही दिवसच टीकला कारण ती तलवार लाकडी होती. यातूनच संकल्पना घेत हळूहळू स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी विविध धातूपासून तलवारी तयार करायला सुरुवात केली.
तलवारीसाठी लागणारा खर्च आणि 'या' काळातील तलवारी : मध्ययुगीन कालखंडात मराठा साम्राज्यामध्ये जी काही शस्त्र वापरली गेली, बहुतांश ती सर्व शस्त्र सत्यजित साकारतो आहे. शिवाय एक मराठा लाख मराठा तलवार तयार करण्यासाठी लागणारा खर्च पाहिले तर लहान मुलांची एक तलवार बनवण्यासाठी कमीत कमी 2500 पर्यंत खर्च येतो, असेही सत्यजित यांनी सांगितले आहे.
सर्वात महागडी तलवार : तलवार ज्या पध्दतीने हवी असल्यास ती तयार करण्यासाठीचे पोलाद उत्तम प्रतीचे हवे, त्याला सोने/चांदी यांचा मुलामा वापरून ग्राहकाच्या पसंतीनुसार त्यात बदल केले जातात. थोडक्यात सोने/चांदी यांचा वापर किती प्रमाणात करायचा हे ठरवले जाते. त्यानुसार तलवारीच्या किमतीत बदल होत जातो. आतापर्यंत सर्वात महागडी तलवार 3 लाखाची बनवली आहे. मी स्वतः एक डिझाईनर आहे. त्यामुळे त्या संबधित माझा व्यवसाय आहे. तलवारीचा प्रत्येकाला संग्रह हवा, असे वाटते. त्यामुळे मी तलवारी तयार करुन देतो, अशी प्रतिक्रियाही सत्यजित यांनी दिली आहे.
'तलवार तयार करणे छंद' : छंद आहे. परंतु छंद जोपसताना जवळच्या मित्रांनी काही तशाच वस्तु बनवून मागितल्या. तेव्हा मी त्यांना प्रेमापोटी विना मोबदला बनवून दिल्या देखील. त्या वस्तुंचीनंतर सोशल मीडियावर वाहवा केली. मग त्या विकत हव्यात तुम्ही बनवून द्याल का? अशी विचारणा होवू लागली. नकळत माझ्या छंदाचा उद्योगात रूपांतर झाले. परंतु आजही मी छंद म्हणूनच याकडे पहातो, असेही सत्यजित म्हणाले.
हेही वाचा - 75 Years Old Women on Bicycle : 75 वर्षांची तरुण आज्जी; सायकलवर फिरला निम्मा भारत