ETV Bharat / state

Sassoon Drugs Racket : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलचा भाऊ नेपाळ बॉर्डरहून ताब्यात - Sassoon Drugs Racket

Sassoon Drugs Racket : पुणे पोलिसांच्या पथकानं अमली पदार्थांचा तस्कर ललित पाटीलच्या भावाला उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून ताब्यात घेतलं. ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलनं आठ दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलं आहे.

Sasun Drugs Racket
Sasun Drugs Racket
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 9:20 PM IST

पुणे : Sassoon Drugs Racket : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॉर्डमधून ललित पाटील हा अमली पदार्थांचा तस्कर फरार झाला होता. आता या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय. पुणे पोलिसांच्या पथकानं ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याच्या साथीदाराला नेपाळ बॉर्डरहून ताब्यात घेतलं. पोलिसांचं पथक या दोघांना घेऊन पुण्याकडे रवाना झालंय.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून ताब्यात घेतलं : या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे यांना मंगळवारी (१० ऑक्टोबर) उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि पुणे शहर गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकानं उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही अमली पदार्थ तयार करणे तसेच त्याच्या विक्रीमध्ये ललित पाटील याला मदत करत होते. या दोघांचा छडा लागल्यामुळे आता या तपासात अनेक महत्वाच्या बाबी उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दोघांना बुधवारी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं जाईल.

९ जणांचं तडकाफडकी निलंबन : ससून ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलनं आठ दिवसांपूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलं होतं. विशेष म्हणजे, ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत त्यानं पळ काढला. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबधीत अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्तांनी अधिकाऱ्यासह ९ जणांचं तडकाफडकी निलंबन केलं. या प्रकरणी ससून रुग्णालय तसेच कारागृह प्रशासनाच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

शिंदे गटाच्या मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप : काही दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचं ड्रग्ज पकडलं होतं. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना रुग्णालयातून पसार झाला. राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्याकरता फोन केला होता, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील या प्रकरणात शिंदे गटाच्या मंत्र्याचा सहभाग असल्याचा आरोप केलाय.

हेही वाचा :

  1. Sassoon Hospital Pune : 'ससून'ची व्यवस्था व्हेंटिलेटरवर? 'ईटीव्ही भारत'चा Reality चेक
  2. Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर
  3. Pune Crime News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांचा तपास सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.