आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढीवारी सोहळा आज अलंकापुरीमध्ये होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे 50 मुख्य वारकऱ्यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर परिसर, संजीवन समाधी मंदिर फुलमाळांनी सजवण्यात आले आहे. मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करून फिजिकल डिस्टन्सचे तंतोतंत पालन केले जात आहे. हा सोहळा विनाविघ्न पार पडणार असल्याचा विश्वास, मुख्य विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी व्यक्त केला.
ना गर्दी ना लाट.. तरीही माऊलींच्या पालखीचा आळंदीत थाट - आषाढी वारी बातमी
संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा संपन्न होत असताना, या सोहळ्यात कोरोनाच्या महामारीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे हा सोहळा मर्यादित लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे.
माऊलींच्या पालखीचा आळंदीत थाट