ETV Bharat / state

Vikhe Patil Criticized Sanjay Raut: झाकीर नाईक यांनी विखेंच्या संस्थेला दिली होती साडेचार कोटींची देणगी; पहा काय म्हणाले मंत्री विखे पाटील

झाकीर नाईक यांनी विखे पाटील यांच्या संस्थेला साडेचार कोटींची मदत दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्याबाबत विखे पाटील यांनी आज खुलासा केला. पुण्यात पत्रकारांशी ते बोलत होते.

Radhakrishna Vikhe Patil  Criticized On  Sanjay Raut
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jun 22, 2023, 6:37 PM IST

माहिती देताना राधाकृष्ण विखे पाटील

पुणे : राष्ट्रद्रोहाचा आरोप असणाऱ्या झाकीर नाईककडून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला साडेचार कोटींची मदत देण्यात आली असल्याचा आरोप, शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे अनेकवेळा पाहिले आहे. आठ ते दहा वर्षापूर्वी झाकीर नाईक यांनी आमच्या संस्थेला साडेचार कोटींची देणगी दिली होती. त्याची चौकशी देखील भारत सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती. ती चौकशी करून दहा वर्षापूर्वीच ती फाईल क्लोज केली होती. ती जी देणगी देण्यात आली होती ती कायदेशीरपणे देण्यात आली होती. ही देणगी जेव्हा देण्यात आली तेव्हा नाईक यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप नव्हता. तेव्हाचा हा प्रकार आहे. संजय राऊत यांना मालकाची चाकरी करायची म्हणून रोज काही ना काही विषय लागतो. म्हणून त्यांनी आता हा विषय काढला असल्याचे यावेळी विखे म्हणाले.

वर्षांपूर्वी ईडीची चौकशी झाली : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, त्यांना जे काही आरोप करायचे आहे ते त्यांनी करावे. तसेच जी काही चौकशी करायची आहे ती देखील करावी. सात ते आठ वर्षांपूर्वी याआधी याबाबत ईडीची चौकशी झाली आहे. पण ईडीची चौकशी झाली म्हणून मी काय भाजपमध्ये आलो असे नाही, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

आठ ते दहा वर्षापूर्वी झाकीर नाईक यांनी आमच्या संस्थेला साडे चार कोटींची देणगी दिली होती. त्याची चौकशी देखील भारत सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती. ती चौकशी करून दहा वर्षापूर्वीच ती फाईल क्लोज केली होती. संजय राऊत यांना मालकाची चाकरी करायची म्हणून रोज काही ना काही विषय लागतो. - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

कोणाचा परिणाम कोणावर झाला? : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपाबाबत पाटील म्हणाले की, अंबादास दानवे यांच्यावर संजय राऊत यांचा परिणाम झाला आहे की, संजय राऊत यांच्यावर अंबादास दानवे यांचा परिणाम झाला आहे. हे माहीत नाही, पहिल्यांदाच महसूल खात्याच्या बदल्यात पारदर्शकता आली आहे. जवळपास 200 बदल्या झाल्या असून चार ते पाच बदल्यांमध्ये मॅटने स्थिगिती दिली आहे. घोटाळेबाज लोकांनी आरोप करने आणि त्याला मी उत्तर देणे हे मला योग्य वाटत नाही.

नवीन वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून, अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन कारवाई अधिक गतिमानतेने करा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिले.

वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी : नागरिकांना स्वस्त दराने वाळू मिळण्यासाठी तसेच अनधिकृत वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती, वाळू धोरण राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या नवीन धोरणानुसार प्रायोगिक तत्वावर एक वर्षासाठी सर्व नागरिकांना प्रति ब्रास ६०० रुपये वाळू उपलब्ध करुन देण्याची कारवाई करावी. सर्वसामान्यांना परवडेल अशा किंमतीत रेती, वाळू उपलब्ध व्हावी, वाळूची अवैध वाहतूक रोखली जावी, यावर राज्य शासनाने भर दिला आहे, असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. Vikhe Patil Criticizes Balasaheb Thorat: भीमगर्जना करणारे बाळासाहेब थोरात खिंड सोडून पळाले; विखे-पाटलांची खरमरीत टीका
  2. Ganesh Sahakari Sugar Factory Election: बाळासाहेब थोरात-कोल्हेंचा विखे पाटलांना जबर धक्का; श्री गणेश साखर कारखाना निवडणुकीने राजकीय समीकरणे बदलणार
  3. Zakir Naik House झाकीर नाईक टार्गेटवर पाहा डोंगरी येथील निवासस्थान परिसरातील व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.