पुणे : छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांचा वारंवार होणारा अवमान या विरोधामध्ये पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेड ( Sambhaji Brigade ) काँग्रेस राष्ट्रवादी ( Congress Nationalist ) तसेच अनेक शिवप्रेमी संघटनेची शिव सन्मान जागर बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीनंतर १३ डिसेंबरला निषेध करण्यासाठी पुणे बंदची हाक ( Pune bandh call ) देण्यात आली आहे.
बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे - ही बैठक कुठल्याही पक्षाची नसून शिवप्रेमी लोकांची आहे. यामध्ये प्रामुख्याने ब्रिगेड संभाजी ब्रिगेड काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे यांची तसेच अनेक मुस्लिम संघटना ही सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर सर्व शिवप्रेमी संघटनांना शिवरायांच्या सन्मानार्थ या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेला आहे.
बंदमध्ये विविध संघटना सहभागी - या बंदमध्ये संपूर्ण पुणे बंद असेल त्यामध्ये सर्व लहानापासून थोर मोठ्या व्यक्तीने शिवाजी महाराज कुठल्याही जाती धर्माचे नसून शिवाजी महाराज हे एकत्रच प्रतीक आहे. त्यामुळे सर्वच लोकांनी आज सहभागी होऊन पुणे बंद करून एक आदर्श महाराष्ट्राला घालून द्यावा. अशी या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विनंती पुणेकर नागरिकांना केलेली आहे. संभाजी ब्रिगेड, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेना या सर्व शिवप्रेमी संघटना काही मुस्लिम संघटनासुद्धा या बंदमध्ये सहभागी असणार आहेत, अशी माहिती आयोजकाकडून देण्यात आली आहे.
राज्यपालांची हाकालपट्टी करण्याची मागणी - छत्रपती उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करण्याची मागणी ( Demand for ouster of Governor Koshyari ) केलेली आहे. परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही सरकारकडून करण्यात येत नसल्याने या बंदची हाक देण्यात आली आहे.