ETV Bharat / state

देहू नगरीत तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा - देहू संस्थानचे विश्वस्त संजय मोरे

पुणे जिल्ह्यातील देहू येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान, भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.

Saint Shrestha Tukaram Maharaj temple
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर
author img

By

Published : Nov 16, 2020, 2:37 PM IST

देहू - गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेली मंदिरे आज खुली करण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यातील देहू येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचेदेखील मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. सकाळपासून तुकोबांच्या दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या आहेत. सोशल डिस्टसिंग, मास्क आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ केल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश दिला जात आहे. देहू संस्थानचे विश्वस्त संजय मोरे यांनी अशी माहिती दिली आहे.

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर

मार्च महिन्यापासून मंदिर होते बंद -

मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील मंदिरे बंद आहेत. मंदिरे सुरू करण्यासाठी विरोधकांनी विविध स्थरावर आंदोलने केली होती. तसेच भाविकांनीदेखील मंदिर सुरू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेर, आठ महिन्यानंतर महाराष्ट्रातील मंदिरे सुरू करण्यात आली असून मंदिर प्रशासनाकडून स्वच्छता बाळगली जात आहे. रविवारी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आले होते.

तुकोबांच्या मंदिरासमोर भक्तांची रांग -
गेल्या आठ महिन्यापासून मंदिरे बंद असल्याने आज भाविकांनी देहू येथील तुकोबांच्या मंदिरासमोर रांग लावली होती. यावेळी मंदिर प्रशासनाकडून विशेष काळजी घेत भक्तांना मास्कचे वाटप करण्यात आले, अशी माहिती देहू संस्थानचे विश्वस्त संजय मोरे यांनी दिली आहे. तसेच भाविकांनीदेखील स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे खबरदारी बाळगून नागरिकांनी इतरांना सहकार्य करण्याची गरज आहे.

हेही वाचा- नितीश कुमार आज घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.