बारामती - बारामती तालुक्यातील माळेगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल १५ लाख २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. माळेगाव खुर्द येथील गोसावी वस्तीतील सोमनाथ सदाशिव गव्हाणे यांच्या शेत जमिनीमध्ये छापा टाकून ही कारवाई केली गेली. पत्र्याच्या शेडलगत असणाऱ्या मोकळ्या जागेत स्वतःच्या अर्थिक फायदयासाठी ३ पानी पत्त्याचा जुगार खेळत असताना पुणे ग्रामीण एलसीबी शाखेने छापा टाकला.
आरोपींना घेतले ताब्यात
सोमनाथ सदाशिव गव्हाणे (वय वर्षे ४२, रा.माळेगाव खुर्द ता.बारामती), रमेश शंकर गायकवाड (वय वर्षे ४०, रा.एस.टी.स्टॅड जवळ, बारामती), राजु शंकर जोगदंड (वय वर्षे ४०,रा.शालीमार चौक, दौंड),अनिश विनायक मोरे (वय वर्षे ३१, रा.आमराई बारामती), संतोष दिनकर रोकडे (वय वर्षे ४५ रा.सासपडे ता.जि.सातारा),अनिल बाळासाहेब माने (वय वर्षे ४५ रा.सासपडे ता.जि.सातारा), राजु शंकर गायकवाड (वय वर्षे ४० रा.एस.टी.स्टॅड समोर, बारामती), कुलदीप बाळासाहेब जगताप (वय वर्षे ३२ रा.सांगवी ता.बारामती), महादेव आण्णा मासाळ (वय वर्षे ५८ रा.मासाळवाडी लोणीभापकर, ता.बारामती), श्रीकांत श्रीनिवास उगले (वय वर्षे ३४ रा.सासपडे ता.जि.सातारा), विजय बाबुराव मोरे (वय वर्षे ४८ रा.कसबा बारामती), फैयाज युनुस मुल्ला (वय वर्षे ३१ रा.बुधवार पेठ फलटण), संतोष किसन शिंदे (वय वर्षे ४२ रा.परंदवाडी ता.फलटण), सुरेश शिवाजी शेलार (वय वर्षे ४९ रा.आमराई, बारामती), विजय सुरेश देशमुख (वय वर्षे १९ रा.आमराई बारामती), विक्रांत अशोक अवधुते (वय वर्षे २४ रा.चंद्रमणी नगर, बारामती) यांना ताब्यात घेतले असून १६ आरोपी विरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,पा सई अमोल गोरे, स.फौ. दत्तात्रय जगताप, विजय माळी, पो.ह. हनुमंत पासलकर, ज्ञानदेव क्षिरसागर, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, काशिनाथ राजापुरे,पो.नि. सागर चंद्रशेखर, गुरू गायकवाड, नितीन भोर, अभिजित एकशिंगे, पो.कॉ. प्रसन्न घाडगे, बाळासाहेब खडके यांनी केलेली आहे.
हेही वाचा - औरंगाबादेत रस्त्यावरील भांडण सोडवणे पडले महाग, तिघांचा मृत्यू तर तिघे जखमी