ETV Bharat / state

RSS Meeting in Pune : पुण्यात आरएसएसची तीन दिवसीय बैठक, 'हे' दिग्गज नेते राहणार उपस्थित

RSS Meeting in Pune : पुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीच आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदप्रसाद नड्डा यांच्यासह सर्व संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पुण्यात आरएसएसची दोन दिवसीय बैठक
RSS Meeting in Pune
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2023, 6:21 PM IST

Updated : Sep 13, 2023, 8:44 PM IST

सुनील आंबेकर, प्रचार प्रमुख, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

पुणे RSS Meeting in Pune : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक उद्यापासून पुण्यात सुरू होणार आहे. ही बैठक 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार असुन, या बैठकीला संघ परिवारातील 36 संस्थांचे 266 प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. या बैटकीत 36 संघटनांच्या कामासंबंधी तसेच देशभरातील इतर विषयांवर चर्चा होणार आहे. पुण्यातील शि. प्र. मंडळीच्या स.प. महाविद्यालय परिसरात ही बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिलीय. (RSS Meeting in Pune) या बैठकीत प्रामुख्याने देशातील वर्तमान परिस्थितीवर चर्चा होणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली

कोणते दिग्गज राहणार उपस्थित : पुण्यात होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat), भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगदप्रसाद नड्डा यांच्यासह सर्व संघटनांचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत संघ परिवारातील विविध संस्था, संघटनाचा मागील वर्षातील कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुढील वर्षाच्या कामाची दिशा देखील ठरवली जाणार आहे. आगामी वर्ष हे निवडणुकांच आहे. तसंच आयोध्येतील राम मंदिराची उभारणीही पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीतील मंथन आणि मार्गदर्शन महत्वाचं ठरणार आहे.

बैठकीत विविध विषयांवर होणार चर्चा : या बैठकीत देशातील वर्तमान परिस्थिती, महिलांसंबंधी विषय, देशातील राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातील चर्चेतल्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. तसंच पर्यावरण, स्वदेशीसह आर्थिक प्रगती, सामाजिक समरसता आदी माध्यमातून सामाजिक समरसता यांचा उहापोह या बैठकीत होणार आहे. बैठकीच्या शेवटच्या दिवशी संघाचे सह सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे पत्रकार परिषद घेऊन 3 दिवस चाललेल्या बैठकीतील विचार विनिमयाविषयी माहिती देणार आहेत. उद्या सकाळी या बैठकीचे उद्घाटन होणार असून दिवसभरात 5 सत्र होणार आहेत. या सत्रात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

बैठकीत अनेक संघटनांचा सहभाग : या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष, भारतीय किसान संघ, विद्या भारती, भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, संस्कृत भारती, अखिल भारतीय साहित्य परिषद या संघटना सहभागी होतील. या सर्व संघटना आणि त्यांच्याशी संबंधित पदाधिकारी समाज जीवनातील विविध क्षेत्रामध्ये सेवा, समर्पण आणि राष्ट्र भावनेने सक्रिय असतात. गेल्या वर्षी ही बैठक छत्तीसगडमधील रायपुर येथे आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. Madan Das Devi passed away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मदनदास देवी यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख
  2. Asaduddin Owaisi : मुस्लिमांना भारतात राहण्याची 'परवानगी' देणारे मोहन भागवत कोण? - असदुद्दीन ओवेसी
  3. Mohan Bhagwat: जातिवादाने समाजाचा नाश; मंदिर, स्मशानभूमी, जलाशय इत्यादींवर संपूर्ण हिंदू समाजाचा समान अधिकार - मोहन भागवत

Last Updated : Sep 13, 2023, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.