ETV Bharat / state

Rohit Pawar On BJP: भाजपासोबत गेलेल्यांना कमळावर निवडणुका लढवाव्या लागू शकतात- रोहित पवार - रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

Rohit Pawar On BJP: पिंपरी चिंचवड शहर हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Rohit Pawar criticism of Ajit Pawar) यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र (Deputy CM Ajit Pawar), गेल्या काही महिन्यात महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली. अजित पवार यांनी भाजपा- शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. (Rohit Pawar criticism of BJP) आता शहरात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार असल्याचं चित्र आहे. भाजपासोबत गेलेल्यांना कमळावर निवडणुका लढवाव्या लागू शकतात, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) रोहित पवार यांनी मांडले आहे. (Pimpri Chinchwad)

Rohit Pawar On BJP
रोहित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2023, 7:50 PM IST

रोहित पवारांचे अजित पवारांविषयी मत

पुणे (पिंपरी चिंचवड) Rohit Pawar On BJP: पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली आणि आज तुषार कामठे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी भव्य दुचाकी रॅली काढत अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरंग लावला आहे. नवनिर्वाचित शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दुचाकी चालवली. तर आमदार रोहित पवार हे त्यांच्या मागे बसलेले होते.

पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक तुषार कामठे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. आज तुषार कामठे यांच्यासह आमदार रोहित पवार यांनी भव्य दुचाकी रॅली काढत अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात सुरंग लावला आहे. निगडी येथील भक्ती शक्ती चौक ते नाशिक फाटा पर्यंत आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत दुचाकी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यानंतर रोहित पवार यांनी काळेवाडी येथे एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

आमदारकी कर्जत, जमनखेड मधूनच लढविणार- रोहित पवार: आगामी लोकसभा आपण लढणार का या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, मी लोकसभा लढणार नाही. विधानसभा मी कर्जत जामखेड येथूनच लढविणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे. कर्जत जामखेडच्या नागरिकांचे माझ्यावर खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी मला मतदारसंघात भरभरून प्रेम दिलं आहे. यापुढेही देणार यात शंका नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

अशांना निवडणुका भाजपाच्या चिन्हावर लढवाव्या लागलीत: सत्तेसाठी काही लोक भाजपाबरोबर गेले. मात्र लोकसभा निवडणुका झाल्यानंतर याच काही नेत्यांना भाजपाच्या कमळावर निवडणूक लढवावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग भाजपाच्या हातचे बाहुले आहे. त्यामुळे आमचे चिन्ह, पक्षनाव काढून घेतले जाईल. पण, आमच्यासोबत शरद पवार आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचे काम जोरात सुरू आहे. पवार साहेब भाजपचे बाप आहेत. इलेक्शन कमिशन हे भाजपाच्या हातातील बाहुली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आमच्या बाजूने निर्णय देईल का, हे सांगणे कठीण आहे. मात्र तरीही पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे नसले तरी शरद पवार साहेब आमच्याकडे आहेत. पक्षाचे नाव देखील बदलले तरी विचार मात्र साहेबांचा असणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

भाजपा कुटुंब आणि पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आहे. भाजपाला हरविण्याची ताकद सामान्य व्यक्ती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. सत्तेत असलेले लोक स्वार्थी, हिताचे राजकारण करत आहेत. भाजपाला लोकनेते आवडत नाहीत. गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, एकनाथराव खडसे यांना भाजपाने संपवलेले आहे- राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार

त्या चार स्थानिक नेत्यांची खरडपट्टी: यापूर्वीच्या काळात नेत्यांच्या मागे चार स्थानिक नेते असायचे आणि तेच पिंपरी-चिंचवड शहरात कोण नगरसेवक होणार आणि कोण होणार नाही हे ठरवत होते. तर या चार जणांमुळे राष्ट्रवादी पक्ष पिंपरी चिंचवड शहरात वाढला नाही, अशी टीका रोहित पवार यांनी स्थानिक नेत्यांवर नाव न घेता अप्रत्यक्षपणे केली आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश स्थानिक नेते आणि नगरसेवक अजित पवार गटांसोबत गेल्याचे चित्र आहे. यावर रोहित पवार यांनी सांगितले की ही चार लोक गेली ती बरेच झाले. त्यांच्यामुळेच पक्ष वाढला नाही. उलट त्यांच्याचमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता गेली.

हेही वाचा:

  1. Maharashtra Political Crisis : अपात्र आमदारांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, 'हे' दिले महत्त्वाचे निर्देश
  2. Cabinet Meeting : पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, काय घेण्यात येणार निर्णय?
  3. OBC March Nagpur: मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध, नागपुरात निघाला महामोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.