ETV Bharat / state

Rohit Pawar on Ajit Pawar : ज्या बापानं मुलांसाठी घर बांधलं, खाऊ घातलं, मोठं केलं...; पुतण्याचा काकावर हल्लाबोल - Pune News

Rohit Pawar on Ajit Pawar : ज्या बापानं मुलांसाठी घर बांधलं, खाऊ घातलं, मोठं केलं, आज हिच मुलं बापाला घरातून बाहेर काढत आहेत, असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटावर केलाय. पुण्यात स्टेडियमची तयारी पाहण्यासाठी रोहित पवार यांनी पत्रकारांना निमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.

Rohit Pawar
रोहित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 10:11 PM IST

प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार

पुणे : Rohit Pawar on Ajit Pawar : सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याजागी कंत्राटी भरती करण्याचं धोरण सरकारनं अवलंबलंय. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. अशातच याबाबत सरकारकडून कंत्राटी भरती (Government Job Recruitment) बाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर रोहित पवार म्हणाले की, हे सरकार अहंकारी (Rohit Pawar On Ajit Pawar Group) आहे. त्यांना सामान्य लोकांचे प्रश्न कळत नाहीत. कंत्राटी भरतीचा निर्णय हा मूर्खपणाचा आहे. हे सरकार युवकांचं ऐकणार नाही, कारण यांना अहंकार आला आहे.

अजित पवार गटाकडून केलं ट्रोल : राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. यानंतर आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना अजित पवार गटाकडून ट्रोल देखील करण्यात आलं होत. यावर रोहित पवार म्हणाले, ते त्यांचं कामच आहे. ज्या वडिलांनी घर बांधलं, आज त्याच वडिलांना घराबाहेर काढलं जात आहे. आज ज्यांना मंत्रिपद दिलं, तेच लोक म्हणत आहेत की, पवार हे स्वतः हा निर्णय घेत होते. तर असं नाही. मंत्रिपदाबाबत कधीही त्यांनी निर्णय घेतला नाही. तर हेच नेते त्याबाबत निर्णय घेत होते. पण येत्या काळात विजय शरद पवार यांचाच होताना दिसेल.

...म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो वापरतात : अजित पवार गटाकडून आता दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचा फोटो (Yashwantrao Chavan Photo) वापरला जात आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या सभेत यशवंत चव्हाण साहेबांचा फोटो दिसत आहे. त्याच चव्हाण साहेबांना पवार साहेबानी गुरू मानलं. त्यांच्या प्रेरणेने पवार साहेब राजकारण करतात. आता पवार साहेबांचा फोटो वापरता येईना म्हणून चव्हाण साहेबांचा फोटो वापरत आहेत. आता चुकीच्या पद्धतीने काम केलं तर कराडच्या समाधीस्थळी जाऊन आत्मक्लेश करण्याची गरज नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या फोटोसमोर बसून केलं तरी चालेल.

मुख्यमंत्री करू असंच ते म्हणणार : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार मुख्यमंत्री होतील असं म्हटलं आहे. यावर रोहित पवार म्हणाले की, पुन्हा कधी तरी मुख्यमंत्री करू असंच ते म्हणणार. आताच मुख्यमंत्री करू, आताच न्याय मिळवून देऊ, आताच मृत रुग्णांना मदत करू, असं ते म्हणणार नाहीत. नेहमीच पुन्हा करू असं त्यांचं म्हणणं असतं.

हेही वाचा -

  1. Relief to Rohit Pawar : रोहित पवारांना दिलासा, 'त्या' नोटीसला उच्च न्यायालयाची स्थगिती
  2. Cricket World Cup 2023 : तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात 'क्रिकेट विश्वचषक'चे सामने; कशी आहे तयारी? जाणून घ्या रोहित पवारांकडून
  3. Notice to Rohit Pawar : दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून मला नोटीस, रोहीत पवारांचा रोख नेमका कुणाकडे?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.