ETV Bharat / state

सहकारनगरमध्ये कोयता आणि बंदुकीच्या धाकाने देशी दारू दुकानात जबरी दरोडा

सहकारनगर परिसरात सातारा-पुणे रस्त्यावरील अरण्येश्वर कॉर्नरजवळ व्ही आर गुप्ता देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात सशस्त्र दरोडा पडला.

Robbery
दरोडा
author img

By

Published : Mar 11, 2021, 11:01 AM IST

पुणे - बंदुक आणि कोयता (पालघन) सारख्या हत्यारांचा धाक दाखवून देशी दारूच्या दुकानाून जबरदस्तीने 57 हजार रुपयांची रोख रक्कम काढून नेल्याची घटना घडली. हा प्रकार बुधवारी (3 मार्च) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सातारा रस्त्यावरील अरण्येश्वर कॉर्नरजवळ घडला. या प्रकरणी नामदेव खंडू जांगटे (वय 42) यांनी फिर्याद दिली असून सहा अज्ञात आरोपींविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

बंदुकीच्या धाकाने देशी दारू दुकानात जबरी दरोडा
सातारा पुणे रस्त्यावरील अरण्येश्वर कॉर्नरजवळ व्ही आर गुप्ता देशी दारूचे दुकान आहे. या दुकानात फिर्यादी काम करतात. बुधवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास ते दुकानात असताना अचानक आलेल्या सहा व्यक्तींनी त्यांना हत्यारांचा धाक दाखवला आणि कॅश काउंटरमधील 57 हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. फिर्यादीने आरोपींना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्यावर वार केले. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.