पुणे - जिल्ह्याच्या उत्तर भागात झालेल्या अतिवृष्टीने नव्याने बांधण्यात आलेल्या अष्टविनायक मार्गावरील बनकरफाटा ते कुमशेत पट्टयातील रस्त्याचे भराव वाहून गेल्याने रस्ता खचला आहे. यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला असून, वाहतूक या मार्गावरील विस्कळीत झाली आहे.
अष्टविनायक मार्गावरील बनकरफाटा ते कुमशेत मार्गाचे काम कंत्राटदाराकडून अर्धवट करण्यात आल्याने ही आपत्ती ओढवल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. यासोबतच अनेक ठिकाणी या नव्या रस्त्यावर खड्डे पडल्याने अष्टविनायक रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
नालासोपाऱ्यात पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य; गणेशोत्सवापूर्वीच केली होती रस्तेदुरूस्ती
सार्वजनिक विभागामार्फत या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, रस्त्याच्या बाजूचा भाग पिचिंग न केल्याने खचला असून, रस्त्याच्या बाजूच्या शेतात राडारोडा व पाणी घुसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.