ETV Bharat / state

Ruturaj Gaikwad : संधीच सोनं करणाऱ्या ऋतुराजला संधी मिळायला हवीच - ऋतुराजचे प्रशिक्षक - Seven sixes in one over

विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकाच ओव्हरमध्ये सात षटकार लगावणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे अवघ्या देशभर कौतुक होत ( Seven sixes in one over  ) आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळणे गरजेचे आहे. असे मत जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे.

Rituraj Gaikwad Seven six
ऋतुराजचे प्रशिक्षक
author img

By

Published : Nov 30, 2022, 4:08 PM IST

Updated : Dec 1, 2022, 6:09 AM IST

पिंपरी-चिंचवड ( पुणे ) : विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकाच ओव्हरमध्ये सात षटकार लगावणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे अवघ्या देशभर कौतुक होत ( Seven sixes in one over ) आहे. त्याचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनी देखील त्याला कौतुकाची थाप देत तो अनेक विक्रम आपल्या नावावर करू शकतो. त्याला भारतीय संघात स्थान मिळणे गरजेचे आहे. तो संधीचे सोने करणारा खेळाडू आहे. असे मत जाधव यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले आहे. ज्या प्रकारे तो खेळत आहे हे पाहून तो लवकरच भारतीय संघात स्थान मिळवेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली ( Rituraj Gaikwad Seven sixes ) आहे.

१२ व्या वर्षी वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश : ऋतुराज गायकवाड ला १२ व्या वर्षी पिंपरी- चिंचवड शहरातील वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश मिळाला, तिथे तो क्रिकेटचे धडे गिरवू लागला. मोहन जाधव ह्यांच्या रूपाने प्रशिक्षक ऋतुराज ला लाभले. प्रशिक्षक मोहन जाधव म्हणाले की, फार आनंद वाटला, आम्ही मॅच बघत होतो. आपला शिष्य वर्ल्ड रेकॉर्ड करतो आहे. सहज बॅटिंग करत त्याने तो रेकॉर्ड केला आहे. ऋतुराज भारतीय क्रिकेट संघासाठी खेळेल हे आम्हाला तो लहान असल्यापासून वाटत होतं. पराक्रम करणारा तो खेळाडू आहे. भारतीय संघासाठी अनेक वर्षे खेळू शकणार तो खेळाडू आहे अशी नेहमी खात्री वाटते. पुढे ते म्हणाले की, मी सल्ला देण्यापेक्षा त्याला भारतीय संघात संधी मिळण्याची खूप गरज आहे. संधीच सोनं करणारा तो प्लेअर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून आणखी संधी मिळायला हवी. तो आज ही भारतीय संघात दिसला असता. तो नक्की परत येईल, तशी त्याची तयारी दिसत आहे. त्याला परत संघात यायचं आहे. तो अनेक विक्रम करेल असा विश्वास जाधव ह्यांनी व्यक्त केला आहे.

संधीच सोनं करणाऱ्या ऋतुराजला संधी मिळायला हवीच

सात षटकार मारणे अवघड गोष्ट : ऋतुराजचा मित्र आणि सलामीवीर विनय पाटील म्हणाला की, एका ओव्हरमध्ये सात षटकार मारणे ही खूप अवघड गोष्ट आहे. दोन तीन सिक्स मारायचे म्हटले तरी ती गोष्ट कठीण असते. ऋतुराजकडे स्किल लेव्हल आणि आत्मविश्वास खूप आहे. लहानपणापासून आम्ही सोबत खेळत आलेलो आहोत. आधीपासून च तो आक्रमक फलंदाज आहे. तो सलामी ला असला की मला कधी दबाव जाणवला नाही अस विनय म्हणाला.

Last Updated : Dec 1, 2022, 6:09 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.