ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात भात पेरणीला वेग

पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये पावसाला विलंब झाल्यामुळे भाताची पेरणी लांबली होती. मात्र, गेल्या 72 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे भात पेरणीला वेग आला आहे.

पेरणी करताना शेतकरी
author img

By

Published : Jul 10, 2019, 5:26 PM IST

पुणे - तांदळाचे आगार समजल्या जाणाऱ्या मावळ, भोर, मुळशी आणि वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाला विलंब झाल्यामुळे भाताच्या पिकाची पेरणी लांबली होती. मात्र, गेल्या 72 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे भात पिकाच्या पेरणीला वेग आला आहे.

पेरणी करताना शेतकरी

मान्सूनचा पाऊस दरवर्षी ७ जून पर्यंत सुरू होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी भाताच्या पिकाची पेरणी जून महिन्यामध्ये सुरू करतात. मात्र, यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा आल्यामुळे भात पिकाच्या पेरणीला जुलै महिना उजाडला आहे.

या टप्प्यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, कर्जत, अंबेमोहर आणि तामसाळ जातीच्या तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे पेरणीला विलंब झाल्यामुळे या जातींच्या तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तांदळाच्या विविध जातींच्या पिकांचे भरघोस उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Intro:पुणे - तांदळाचे आगार समजल्या जाणाऱ्या मावळ, भोर, मुळशी आणि वेल्हा तालुक्यांमध्ये पावसाला विलंब झाल्यामुळे भाताच्या पिकाची पेरणी लांबली होती. मात्र, गेल्या 72 तासांमध्ये झालेल्या पावसामुळे भात पिकाच्या पेरणीला वेग आला आहे.

Body:दरवर्षी 7 जून पर्यंत मान्सूनचा पाऊस सुरू होतो. त्यामुळे या भागातील शेतकरी भाताच्या पिकाची पेरणी जून महिन्यामध्ये सुरू करतात. मात्र, यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा आल्यामुळे भात पिकाच्या पेरणीला जुलै महिना उजाडला आहे.

या टप्प्यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, कर्जत, अम्बेमोहर आणि तामसाळ जातीच्या तांदळाचे उत्पादन होते. त्यामुळे पेरणीला विलंब झाल्यामुळे या जातींच्या तांदळाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे मात्र, पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर दरवर्षीप्रमाणे यंदा देखील तांदळाच्या विविध जातींच्या पिकांचे भरघोस उत्पादन होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

Visuals Sent on Mojo
Rice Crop Story

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.