पुणे- हुतात्मा राजगुरुंची जन्मभूमी असलेल्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध सांस्कृतिक, सामाजिक, देशभक्ती असे संदेश देणाऱ्या गाण्यांवर तसेच 'इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो' या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
हेही वाचा- बुरहान वाणीला कंठस्नान घालणाऱ्या 'या' अधिकाऱ्याला राष्ट्रपती पोलीस पदक
जिल्हा परिषद शाळा टाकळकरवाडी येथे रविवारी सकाळी संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढत शाळेसमोर ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी गावकरी महिला, पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शालेय जीवनात पुस्तकी ज्ञानाबरोबर मुलांमधील असणाऱ्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी शिक्षक विविध प्रयोग राबवितात. त्याला विद्यार्थीही चांगला प्रतिसाद देतात. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त चिमुकल्यांनी देशभक्ती, सांस्कृतिक, कष्टकरी बळीराजा, अशा विविध गाण्यांवर ठेका धरत सामाजिक संदेश दिला.