पुणे - न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. यावर आता पुणेकरांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. इंग्लंड येथे झालेल्या या सामन्याच्या पराभवाचं कारण कोणी एक व्यक्ती नसून ही संपूर्ण संघाची जबाबदारी असल्याचे अनेकांनी म्हटलं आहे.
तर काहींनी धोनीला चौथ्या क्रमांकावर खेळायला न पठवल्यामुळेच भारताला या पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे म्हटलं आहे. चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतला खेळायला पाठवण्याच्या निर्णयावर जोरदार टीका करत पुणेकरांनी हेच भारताच्या पराभवाचे कारण असल्याचे म्हटले आहे.