ETV Bharat / state

आईचा बाळासाठी संघर्ष; 9 महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन कर्तव्य बजावतेय 'ही' महिला पोलीस

Pune Woman Police Constable story : कोणतीही महिला जेव्हा आई होते तेव्हा ती पूर्णपणे बदलून जाते. तिच्यासाठी तिचं बाळ हे सर्वस्व असतं. मात्र, त्याचवेळी ती आपली कर्तव्यं देखील चोखपणे पार पाडत असते. पण जेव्हा एखादी महिला सार्वजनिक जीवनात अशा प्रकारची कर्तव्यं बजावते तेव्हा चर्चा तर होणारच ना. अशीच एक चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. मंगल सयाजी लाकडे असं या महिला पोलिसाचं नाव आहे. त्यांना आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन कर्तव्य करावं लागतंय.

Woman Police Constable
बाळाला घेऊन कर्तव्य
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 8:26 PM IST

Updated : Dec 27, 2023, 10:24 PM IST

पुण्यात आईचा बाळासाठी संघर्ष

पुणे Pune Woman Police Constable story : आजही समाजात स्त्री पुरुष समानतेचे धडे हे दिले जातात. पुणे शहराला तर मोठा ऐतिहासिक इतिहास आहे. परंतु याच पुण्यनगरीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. परंतु आजही महिलांना आपल्या हक्कासाठी लढावं लागत आहे. त्यांना संघर्ष देखील करावं लागत आहे. अश्यातच पुण्यातील पोलीस खात्यात असणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलला आपल्या 9 महिन्याच्या बाळाला सोबत घेऊन कर्तव्य करावं लागतंय. तसेच वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हातात लहान बाळ घेऊन बजावते ती कर्तव्य : आज पुण्यातील सेंट्रल बिल्डिंग बाहेर शिक्षकांचा मोर्चा होता. या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लष्कर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबलला ड्युटी लावण्यात आली. हातात लहान बाळ घेऊन ही महिला कॉन्स्टेबल आपलं कर्तव्य बजावत होती. कर्तव्य बजावत असताना लहान मुलगा रडत होता. सेंट्रल बिल्डिंग येथे आपल्या कामानिमित्त आलेले आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्या ठिकाणी आले. त्यांनी या महिला कॉन्स्टेबलची विचारपूस केली. त्यावेळी महिला कॉन्स्टेबलने वरिष्ठ त्रास देत आहेत. लहान बाळ असतानाही बंदोबस्ताच्या ड्युटी लावत असल्याचं सांगितलं. त्यानंतर आमदार रवींद्र धंगेकर यांनी लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांना फोन लावून याबाबत विचारणा केली.

सावित्रीच्या लेकीला अशी वागणूक का : याबाबत पोलिस आयुक्तांना भेटणार असून दशरथ पाटील यांना ताकीद देण्याचा सूचना देणार आहोत, असं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं. सावित्रीच्या लेकींना अशा पद्धतीने वागणूक मिळत असेल तर गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न आमदार धंगेकारांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रार करूनही उपयोग होत नाही. लहान मुलाला घेऊन ड्युटी करावी लागते. माझ्यासारख्या अनेक महिला कॉन्स्टेबल आहेत त्यांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्रास देत असल्याचं महिला कॉन्स्टेबलने यावेळी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. Akshay Gavate Died : सर्वांना अभिमान वाटावा असा अक्षय आम्हा सर्वांना सोडून गेला...म्हणत मित्रांना अश्रू अनावर!
  2. Anantnag Encounter : जिथं बजावलं पहिलं कर्तव्य तिथंच घेतला अखेरचा श्वास, पानिपतच्या मेजर आशिष धौंचकची शौर्यगाथा
  3. कर्तव्य बजावून घरी परतताना पोलीस कर्मचाऱ्याचा मांजानं चिरला गळा; आयुष्याची तुटली 'दोर'

Last Updated : Dec 27, 2023, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.