ETV Bharat / state

अंध तरुणीवर अज्ञात दोन जणांकडून बलात्कार, दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल - अंध तरुणी बलात्कार मालाड

जन्मत: अंध असलेल्या तरुणीवर अज्ञात दोन व्यक्तींनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्टोबर (2021) महिन्यात सदर तरुणी रेल्वे स्टेशनवर फिरून हेडफोन विकण्याचे काम करत असताना मालाड रेल्वे स्टेशन येथे तिच्यावर बलात्कार झाला. सदर तरुणी या प्रकारानंतर गरोदर राहिली.

Daund police
दौंड पोलीस
author img

By

Published : Feb 9, 2022, 10:25 PM IST

पुणे - जन्मत: अंध असलेल्या तरुणीवर अज्ञात दोन व्यक्तींनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्टोबर (2021) महिन्यात सदर तरुणी रेल्वे स्टेशनवर फिरून हेडफोन विकण्याचे काम करत असताना मालाड रेल्वे स्टेशन येथे तिच्यावर बलात्कार झाला. सदर तरुणी या प्रकारानंतर गरोदर राहिली. सध्या तरुणी दौंड तालुक्यातील एका कंपनीत काम करत आहे. या प्रकाराबाबत दौंड पोलीस स्टेशन येथे काल गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा - HSC Exam Hall Ticket : विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात, 'या' संकेस्थळावरून करा डाऊनलोड

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिच तरुणी कुरकुंभ पांढरेवाडी येथे दोन मैत्रीणींसह कंपनीच्या रूममध्ये भाड्याने राहाते. कुरकुंभमधील कंपनीमध्ये पेन्सील बॉक्स बनविण्याचे आणि भरायचे काम करून ती स्वतः ची उपजिविका करत आहे.

तरुणी ऑक्टोबर 2021 मध्ये रेल्वेने उल्हासनगर रेल्वे स्टेशनवरून मालाड येथे रेल्वे स्टेशनवर गेली होती. तेथे स्टेशनवर फिरून हेडफोन विकण्याचे काम ती करत होती. यावेळी रात्र झाल्याने ती प्लॅटफॉर्म नं 2 वर थांबली होती. अचानकपणे अनोळखी व्यक्ती तिचे तोंड दाबून हाताला धरून तिला बाजुला घेवून गेले आणि तिच्यावर बलात्कार केला. दहा मिनिटांनी पुन्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

या प्रकारानंतर पीडित तरुणीकडे असलेले कागदपत्र, मोबाईल, पर्स घेवून ते अज्ञात व्यक्ती तेथून निघून गेले. त्यानंतर घाबरून तरुणीने कोणाला काही सांगितले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणी लातूरला रेल्वेने रवाना झाली. त्यानंतर लातूरला बसस्टँड, रेल्वे स्टेशन येथे ती थांबली होती. डिसेंबर 2021 मध्ये ती लातूरहून रेल्वेने पुण्याला गेली. नंतर तिला ओळखीने कुरकुंभ येथील एका कंपनीत पेन्सील बॉक्स बनविण्याचे काम मिळाले. त्या दरम्यान तरुणीस मासिक पाळी न आल्याने ती कुरकुंभ येथील सरकारी रुग्णालयात गेली. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून गरोदर असल्याचे सांगितले. यानंतर तरुणीवर पुढील उपचार सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.

हेही वाचा - Pune Electricity Failure : पुण्यातील बहुतांशी भागातील बत्ती गुल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.