ETV Bharat / state

Ranjit Singh Naik Nimbalkar : रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मध्यरात्री घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट

म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मध्यरात्री दोन वाजता आदोलन स्थळी जाऊन भेट घेतली. त्यांच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत अश्याच पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

Ranjit Singh Naik Nimbalkar
मध्यरात्री घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट
author img

By

Published : Jan 14, 2023, 8:34 AM IST

Updated : Jan 14, 2023, 11:42 AM IST

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी मध्यरात्री घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट

पुणे : राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा.या मागणीसाठी पुण्यातील अलका चौक येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावतीने आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून जोरदार घोषणा देण्यात येत आहे. सकाळी 10 वाजल्यापासून सुरू असलेले हे आंदोलन अजूनही सुरच आहे. मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत उद्या तुमच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले आहे.

मुलांच्या मागण्या जाणून घेऊ : या आंदोलनात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सकाळी 10 वाजल्यापासूनच सामील झाले असून ते देखील अजूनही विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सहभागी झाले आहे. मध्यरात्री म्हाडा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आज स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याची मला कल्पना नव्हती. मी जात असताना मला विद्यार्थी दिसले म्हणून मी आलो आहे. या मुलांच्या काय मागण्या आहेत. ते समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला असून उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत मी स्वतः हा चर्चा करणार असल्याचे यावेळी निंबाळकर यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात बदल : विद्यार्थी मागील अनेक वर्षांपासून राज्यसेवा परीक्षेची तयारी करीत आहोत. पण अचानक आयोगाकडून आदेश काढला जातो की 2023 पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहेत. हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आयोगाने 2025 मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे. राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय 2025 पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा. अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात येत आहे.

मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन : राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न 2025 पासून राबविण्यात यावा. या मागणीसाठी सातत्याने विद्यार्थ्यांच्या वतीने याआधी आंदोलने करण्यात आली. पण सरकारने फक्त आश्वासन दिली. नागपूर येथील अधिवेशनात देखील आंदोलन युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आले आणि वेगळ्याच शिष्टमंडळाला बोलवण्यात आले. आत्ता जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तो पर्यंत अश्याच पद्धतीने आंदोलने करण्यात येणार असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले.

एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने : पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत. अनेक वर्ष विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतात. मात्र, 2023 मध्ये अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. अभ्यासक्रमातील बदलास विरोध करत नव्या अभ्यासक्रमाबाबतच नियम किंवा नवा पॅटर्न 2025 मध्ये लागू करावा. या नव्या पॅटर्नबाबत जर सरकारने निर्णय घेतला नाही आम्ही आंदोलने सुरू ठेवू असे म्हणत मोठ्या संख्येने आंदोलक विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा : Bullet Train Boisar Station : पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला वेग; 100 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण

Last Updated : Jan 14, 2023, 11:42 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.