पुणे - जेसीबीने ज्या पद्धतीने बैलाला ठार केले ते अत्यंत चुकीचे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी किंवा वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पिसाळलेल्या बैलाला योग्यरितीने मारता आले असते, असे मत शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात जेसीबीच्या सहाय्याने बैल ठार केल्याच्या घटनेनेबाबत ते बोलत होते.
या संदर्भातली सविस्तर बातमी वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा -
जेसीबीने बैलाला ठार केल्याप्रकरणात गुन्हा दाखल; इंदापूर तालुक्यातील घटना
दरम्यान, खरा शेतकरी असे कृत्य करणार नाही. बैल जर पिसाळला असेल तर मनावर दगड ठेवून त्याला वेगळ्या पद्धतीने मारता आले असते. यापूर्वी अशा घटना घडलेल्या असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.