पुणे - शिक्षणाला डिग्री लागते. मात्र, कलेला डिग्री लागत नाही. त्यामुळे मला आजपर्यंत कोणी माझी डिग्री विचारली नाही. म्हणून तुमच्यातील कला जीवंत ठेवा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे व्यक्त केले. पुण्यातील बालगंधर्व येथे झील इन्स्टिट्यूट आणि कार्टुनिस्ट कंबाईन यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यंगचित्र रेखाटण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ व्यंगचित्रकार शी. द. फडणीस यांच्या हस्ते व्यंगचित्र काढून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.
पुढे ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली कला असते. ती प्रत्येकाने जोपासली पाहीजे. कारण, कलेला कोणतीही डिग्री लागत नाही. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभाला पालक हवे होते. आपल्या मुलांच्या अंगी असलेली कला पाहून त्यांना काय मार्गदर्शन करायला हवे हे त्यांना कळाले असते. राज्य सरकार चित्रकला हा विषय पर्यायी म्हणून ठेवते. त्यामुळे अशा संस्था उभ्या राहणे आवश्यक असते. मी जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतले. तिसऱ्या वर्षाला मी शिक्षण सोडले. मला राजकीय व्यंगचित्रकार व्हायचे होते. मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या वडिलांकडून व्यंगचित्र शिकलो. मला व्यंगचित्रकार होण्यासाठी कुठल्या डिग्रीची गरज लागली नाही.
हेही वाचा - #CoronaVirus : चीनमध्ये एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेणारा 'तो' सुखरूप परतला
हेही वाचा - यासाठी 'ते' करायचे 'पबजी' गेमचा वापर
फक्त व्यंगचित्राच्या कार्यक्रमासाठी मुंबईवरून पुण्याला आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्राचे प्रात्याक्षिक तुम्हाला पाहायला मिळाले, हे तुमचे भाग्य असल्याचे राज ठाकरे उपस्थित विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले.
हेही वाचा - गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार