पुणे - शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या आज होणाऱ्या नियोजित बैठका रद्द केल्या आहेत. आज दुपारी फक्त मनसेच्या निवडक शहर पदाधिकारी यांच्या सोबतच छोटेखानी बैठक घेऊन दोन एप्रिलला मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शहरात विविध पदावर नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना ही मेळाव्यातच नियुक्तीपत्र दिलं जाईल, असे मनसेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत.
हेही वाचा - भाजप नेते डिस्टर्ब.. सुधीर मुनगंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीची होणार चौकशी - नाना पटोले
शुक्रवारी 1805 रुग्णांची नोद -
पुणे शहरावरील कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसते आहे. आज (शुक्रवारी) १२ मार्चला दिवसभरात १८०५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १३ बाधितांचा मृत्यू झाला. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. शहरात गेल्या काही दिवसात दररोज १५०-२०० नवे रुग्ण शहरात आढळून येत आहेत. आज दिवसभरात ८ हजार ८६०२ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. तर दिवसभरात ५९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर मागील २४ तासांत १३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यातील ५ रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या ३४१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण बाधितांची संख्या २ लाख १४ हजार ८३०वर पोहोचली आहे. तर सध्या पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ९७४० इतकी आहे. आजपर्यत ४ हजार ९२५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण २ लाख १६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
हेही वाचा - राज्याच्या परिवहन आयुक्तांची बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनपेक्षित भेट