पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष कोलमडून पडले आहे. थेट शाळा सुरू करता येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाला सुरवात करण्यात आलीय. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावलाय. पुण्यातील रायन इंटरनॅशनल स्कुल प्रशासनाने तर फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची दारेच बंद केली. पुण्याच्या बावधन परिसरात असणाऱ्या शाळेत हा प्रकार घडला. या शाळेत शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या पालकांशी बोलून ईटीव्ही भारतने सत्य जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न….
याविषयी सांगताना शिल्पा महाजनी म्हणाल्या, की रायन स्कुलने एप्रिल महिन्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू केले. परंतु शाळा प्रशासन शाळा शुल्क, ट्युशन शुल्क, कॉम्प्युटर लायब्ररी, बस शुल्क असे सर्वच शुल्क भरण्याची मागणी करीत आहेत. परंतु पालक समितीने विद्यार्थी यातील अनेक गोष्टी सध्या वापरत नाहीत, त्यामुळे शाळेने सरसकट फी न आकारता फक्त ट्युशन फी आकारावी अशी मागणी केली. परंतु शाळा प्रशासनाने आमचे म्हणणे ऐकून न घेता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण अचानक बंद केले.
आनंद मेश्राम यांची दोन्ही मुलं रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये आहेत. ते म्हणाले, स्कुल मॅनेजमेंट मनमानी कारभार करीत असून शाळेची संपूर्ण फी भरण्यासाठी आमच्याकडे तगादा लावला जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती आम्ही अनेकदा केलीय. परंतु शाळेने काहीही न सांगता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टलचे अक्सेस अचानक काढून घेतले. शाळेने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम झाला असून पालकही तणावाखाली आहेत. शाळा प्रशासनाने पालक समितीच्या मागण्या लक्षात घेऊन अवास्तव शुल्क आकारु नये आणि शुल्क भरण्यासाठी वेळ द्यावा.
आरती महाजन म्हणाल्या, पालक समितीने स्कुल प्रशासनाला या सर्व मुद्यावर बोलण्यासाठी भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु स्कुल प्रशासनाकडून पालकांना न भेटता वैयक्तिक फोन करून फी भरण्यासाठी सांगितले जात आहे. 4 ऑगस्टपासून फी न भरल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणाचे अक्सेस काढून घेण्यात आले आहेत.
दरवर्षी शाळा एसएमएसद्वारे अथवा त्यांच्या पोर्टलद्वारे शाळेची फि भरण्यासाठी सूचित करत असते. पण यावर्षी covid-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर सरकारच्या आदेशानुसार शाळेला शुल्क घेता येणार नाही. त्यामुळे शाळा कुठल्याही लिखित स्वरूपात शुल्क मागणी न करता फोन वरून शुल्क भरण्यास सांगत आहे. प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेतील ज्या सुविधा वापरतच नाहीत त्याचे पैसे आम्ही का भरावे, असा पवित्राही काही पालकांनी घेतला. दरम्यान या सर्व प्रकरणावर रायन इंटरनॅशनल स्कुलची बाजू जाणून घेण्याचाही आम्ही प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही.
शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद - पुणे रायन इंटरनॅशनल स्कुल प्रशासन पालक वाद
आनंद मेश्राम यांची दोन्ही मुलं रायन इंटरनॅशनल स्कुलमध्ये आहेत. ते म्हणाले, स्कुल मॅनेजमेंट मनमानी कारभार करीत असून शाळेची संपूर्ण फी भरण्यासाठी आमच्याकडे तगादा लावला जात आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटानंतर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाने सहकार्य करावे अशी विनंती आम्ही अनेकदा केलीय. परंतु शाळेने काहीही न सांगता विद्यार्थ्यांचे ऑनलाईन पोर्टलचे आॅक्सेस अचानक काढून घेतले.