पुणे - शहरातील विविध भागांना आज अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. शहरातील शिवाजीनगर, पर्वती, वारजे, शिवणे, रास्ता पेठ, डेक्कन, सिंहगड रोड या भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. लॉकडाऊन असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती. त्यामुळे नागरिकांची कुठलीही गैरसोय झाली नाही. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे हवेत गारवा पसरला.
पुण्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने आधीच वर्तवला होता. त्यानुसार आज दुपारपासून शहरात उकाडा जाणवत होता. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास शहराच्या विविध भागात ढगाळ वातावरण तयार झाले आणि काही वेळाने पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने शरातील काही रस्त्यांवर पाणी साचले होते. तर या पावसामुळे लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडलेल्या पुणेकरांची उकाड्यातून काही अंशी सुटका झाली.
हेही वाचा - 'स्थलांतरासाठी कामगारांनी घाई करू नये, प्रशासन योग्य पद्धतीने नियोजन करेल'