पुणे- पंधरा दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी शिरूर तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे हा पाऊस खरीपाच्या पेरण्यांसाठी वरदान ठरणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साह पहायला मिळाला.
पावसाने दडी मारल्याने शिरुरसाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. चासकमान धरणात पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा असताना पाणी सोडण्यात आले होते. शिरुर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने चासकमान धरणातुन होणार पाण्याचा विसर्ग थांबवण्यात येणार का?,असा सवाल केला जात आहे.
खरीप हंगामातील काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत. काही ठिकाणी पैरण्यांची लगबग सुरु आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या पावसाने शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे.