पुणे Rain In Konkan Goa : 4 ऑक्टोबर नंतर मान्सून परतणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असं असताना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. अशातच आता येत्या 4 ऑक्टोबरनंतर महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात होणार आहे. आता दक्षिण मध्य महाराष्ट्रात खराब हवामान राहण्याची शक्यता असून याचा परिणाम पुण्याच्या हवामानावरही होणार आहे. पुण्यात मेघ गर्जनेसह पाऊस पडणार आहे.
कोकण, गोवा भागात पावसाची शक्यता : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा या भागात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासह तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत काही भागात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट : मराठवाडा येथे पुढील दोन दिवस हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भात पुढील दोन दिवस हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: