ETV Bharat / state

पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू

पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने अक्षरश: थैमान माजवले. या अतिवृष्टीत नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पासलकर पुलाखाली पाण्याच्या लोंढ्यात चारचाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. तर, शहरातील अनेक भाग पाणी साचल्याने जलमय झाले

पुण्यात पावसाचा कहर
author img

By

Published : Sep 26, 2019, 10:37 AM IST

पुणे - शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला. शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले तर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने अनेक भाग जलमय झाले. शहरातील नांदेड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पासलकर पुलाखाली पाण्याच्या लोंढ्यात चारचाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. किशोर गिरमे असे पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या कार चालकाचे नाव आहे.

पुण्यात पावसाचा कहर

पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या पावसाने अक्षरश: थैमान माजवले. या अतिवृष्टीत शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचून परिसर जलमय झाल्याने नागरिकांचे हाल झाले. रात्रीच्या वेळी नांदेड सिटीकडे जाणारी चारचाकी पावसाच्या पाण्यात वाहुन गेली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला असून, यात दगावलेल्यांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती आहे. याशिवाय वडगाव पुलाजवळ लावलेले अनेक वाहन या पाण्यात वाहून गेले. रिक्षा चारचाकी तसेच दुचाकींचे देखील पावसात मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा - पावसाचा हाहाकार; पुण्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू
कात्रज कोंढवा रस्त्यावर महापूर आल्याची परिस्थिती होती. कात्रज येथे पुलाखाली उभ्या केलेल्या 50 हुन अधिक चारचाकी, दुचाकी, रिक्षा वाहुन गेल्या. तर, एका वृद्ध महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करणारादेखील पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील लेक टाऊन येथील 10 दुचाकी, सिमेंटचा रस्ताही वाहून गेला. त्यामुळे लेकटाऊनकडून राजस सोसायटीकडे जाणारा रस्ता आता पुढील काही दिवस बंद राहील अशी स्थिती आहे.

हेही वाचा - पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, अनेक रस्ते जलमय
अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने सर्व पंप / मोटार नादुरूस्त झाले आहेत. त्यामुळे पद्मावती पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या खालील भागांना पाणी पुरवठा होणार नाही. तर, संपूर्ण बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परिसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परीसर सातारा रोड परीसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

हेही वाचा - पुणे-नगर महामार्गावर खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी; प्रवाशांचे हाल

Intro:पुण्यात अतिवृष्टीBody:mh_pun_01_rain_disastaer_pune_av_7201348

anchor
पुणे शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला..शहराच्या अनेक भागात पावसाचे पाणी तुंबल्याची परिस्थिती होती तर शहरातून वाहणारे नाल्यांचे पाणी नागरी वस्तीत आल्याने रस्त्यावर आल्याने अनेक भाग जलमय झाले शहरातील नांदेड सिटी कडे जाणाऱ्या रस्त्यावर पासलकर पुला खाली पाण्याच्या लोंढ्यात चारचाकी वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झालाय त्यामुळे
पुणे शहरातील पावसात रात्री चारचाकी वाहुन गेल्याने दगावलेल्यांची संख्या वाढली आहे. किशोर गिरमे असे पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या कार चालकाचे नाव आहे. वडगाव पुला जवळ लावलेले अनेक वाहन या पाण्यात वाहून गेले रिक्षा चारचाकी तसेच दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे..कात्रज कोंढवा रस्ता
वर महापूर आल्याची परिस्थिती होती..कात्रज येथे पुलाखाली उभ्या केलेल्या 50 हुन अधिक चार चाकी दुचाकी रिक्षा वाहुन गेल्या. एका ज्येष्ठ महिलेस तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारा ही वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.परिसरातील
लेक टाऊन येथील 10 दुचाकी वाहून गेल्या तसेच सिमेंटचा रस्त्या वाहून गेला. त्यामुळे लेकटाऊन कडून राजस सोसायटी कडे जाणारा रस्ता आता पुढील काही दिवस बंद राहील अशी स्थिती आहे..अतिवृष्टीमुळे पद्मावती पंपिंग स्टेशन मध्ये पाणी शिरल्याने सर्व पंप / मोटार नादुरूस्त झाले आहेत. त्या मुळे पद्मावती पंपिंग स्टेशन वर अवलंबून असणार्या खालील भागांना पाणी पुरवठा होणारं नाही. संपू्र्ण बिबवेवाडी, कोंढवा, मर्केट यार्ड परीसर, धनकवडी, बालाजी नगर, सहकार नगर परीसर सातारा रोड परीसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.