ETV Bharat / state

शेतकरी, महिलांबाबत सरकार अपयशी.. २५ फेब्रुवारीला भाजप करणार आंदोलन - Rahul Kul on shivsena

भाजपचा विश्वासघात करून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने आता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. याचा निषेध करण्यासाठी भाजप २५ फेब्रुवारी रोजी दौंड येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.

आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषद
आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषद
author img

By

Published : Feb 22, 2020, 5:21 PM IST

पुणे- जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकासआघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. याचा निषेध करण्यासाठी भाजप २५ फेब्रुवारी रोजी दौंड येथे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे, अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आमदार राहुल कुल यांनी पत्रकार परिषद..

हेही वाचा- आमचं चुकलचं.. सदाभाऊ खोतांवर काय म्हणालेत राजू शेट्टी

सरकारला आश्वासनाचा विसर...

भाजपचा विश्वासघात करुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने आता शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापनेच्या वेळी अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा सरकारने केली होती. मात्र, आता त्या आश्वासनाचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू, अशा घोषणा करणाऱ्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही, असे राहुल कुल म्हणाले.

कर्जमाफी योजना फसवी...

कर्जमाफी योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे. सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्प मुदतीची पीक कर्जे माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ...

राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना धाक बसविण्याऐवजी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात मश्गुल आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अ‌ॅसिड हल्ला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार, बलात्कार, महिलांना जाळून टाकणे अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला, तरुणी, मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरले आहे.

दरम्यान, आंदोलनात वासुदेव काळे, कांचन कुल, नामदेव नाना बारवकर, तानाजी दिवेकर, नामदेव ताकवणे, आनंद थोरात, महेश भागवत, राजाभाऊ तांबे, गणेश आखाडे, सुनील शर्मा, स्वप्नील शहा, फिरोज खान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.