ETV Bharat / state

BJP Leaders Dispute बाहेरच्या लोकांनी नामांतराविषयी बोलू नये, नगरच्या नामांतरावरुन विखे पाटलांनी पडळकरांना सुनावले - नामांतराविषयी बोलू नये

भाजपचे नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar Demand ) यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण करण्याची मागणी केली होती. त्याला खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil Criticized To Gopichand Padalkar) यांनी जोरदार विरोध केला. त्यावर आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Vikhe Patil Criticize To Gopichand Padalkar ) यांना विचारले असता, त्यांनी बाहेरच्या लोकांनी नामांतराविषयी बोलू नये, असे पडळकरांना सुनावले. त्यासह आपण पडळकर यांच्याशी बोलणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Jan 3, 2023, 4:43 PM IST

पुणे - अहमदनगरच्या नामांतराची मागणी करणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar Demand ) यांच्या भूमिकेशी त्यांच्याच पक्षाचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील ( Sujay Vikhe Patil Criticized To Gopichand Padalkar) यांनी असहमती दर्शविली आहे. त्यानंतर आता महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी देखील आपल्या मुलाच्या सुरात सूर मिळवत पडळकरांच्या मागणीला कडाडून विरोध ( Vikhe Patil Criticize To Gopichand Padalkar ) केला आहे. बाहेरच्या लोकांनी येऊन नामांतराविषयी भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत, हे महत्त्वाचे आहे. याविषयी मी गोपीचंद पडळकर यांच्याशी बोलणार असल्याचे विखे पाटील यावेळी म्हणाले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी सात्वनपर भेट दिली. यावेळी ते बोलत होते.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगरच्या नामकरणाचा निर्णय अंतिम नाही गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या मागणीवर पाटील यांना विचारले असता, ते म्हणाले की नगरच्या नामकरणाचा अंतिम निर्णय झालेला नाही. अनेक वर्षे आपण औरंगाबादला संभाजीनगर नाव देण्याची मागणी ऐकत आलो. मात्र नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे ( Radhakrishna Vikhe Patil Statement ) लक्ष केंद्रित करण्याची जास्त गरज आहे. जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा विनाकारण केली जात असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. गोपीचंद पडळकर हे माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलेल. त्यांच्या भावना होत्या, त्यांचे व्यक्तिगत मत होते ते त्यांनी व्यक्त केले. प्रश्नाचे विनाकारण काही लोक राजकारण करत आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत बसून आम्ही यावर चर्चा करू, असे देखील राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

राज्यातील अनेक जिल्हे मोठे नाशिक, नगर, पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा केली जात आहे. जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करत आहोत. ठाण्यामध्ये सात महापालिका होत्या, तशी परिस्थिती नगरमध्ये नाही. नगर जिल्ह्याचा विकास आराखडा ( Radhakrishna Vikhe Patil Statement ) तयार करायला आम्ही घेतला आहे. औद्योगिक पर्यटन या जिल्ह्याच्या क्षमतेतून रोजगार निर्मिती घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असे देखील यावेळी विखे पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.