ETV Bharat / state

ईडीची भीती दाखवल्यानेच शिवसेना भाजपसोबत - राधाकृष्ण विख

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी भाजप निर्लज्ज पक्ष आहे, चौकीदार चोर आहे अशी अनेक वेळा वाईट शब्दात टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यामध्येही भाजप शहीद झालेल्या जवानांच्या टाळूवरचे लोणी खाते आहे, अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली.

author img

By

Published : Feb 18, 2019, 8:19 PM IST

पुणे - भाजप शिवसेनेची युती हा शिवसेनेने मांडवली करण्याचाच प्रकार आहे. उद्धव ठाकरे यांना ईडीची भीती दाखवल्यानेच ते युतीसाठी तयार झाल्याचे वक्तव्य विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील
undefined

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, की उद्धव ठाकरे यांनी भाजप निर्लज्ज पक्ष आहे, चौकीदार चोर आहे अशी अनेक वेळा वाईट शब्दात टीका केली आहे. पुलवामा हल्ल्यामध्येही भाजप शहीद झालेल्या जवानांच्या टाळूवरचे लोणी खाते आहे, अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली. अयोध्येत राममंदिर झाल्याशिवाय पुढे चर्चा नाही. शेतकऱ्यांना मदत झाल्याशिवाय भाजपसोबत चर्चा नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणत होते. मात्र, तरीही युती होते आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांना काय चिरीमिरी मिळाली ते महाराष्ट्राच्या जनतेला कळाले पाहिजे, अशीही मागणी विखेंनी केली.

विखे यांनी भाजपवरही निशाणा साधला. एकीकडे शिवसेनेने अनेक आरोप करत शेलकी टीका केली. मात्र, 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणवणाऱ्या भाजपने युतीसाठी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, अशी टीका विखे यांनी केली.

Intro:r mh pune 01 18feb19 vikhe patil on yuti r waghBody:r mh pune 01 18feb19 vikhe patil on yuti r wagh

Anchor
भाजप शिवसेनेची युती हा शिवसेनेने मांडवली करण्याचाच प्रकार आहे, उद्धव ठाकरे यांना ई डी ची भीती दाखवल्यानेच ते युती साठी तयार झाले असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे...शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा भाजपवर वाईट शब्दात टीका केली आहे, भाजप हा निर्लज्ज पक्ष आहे, चौकीदार चोर आहे....पुलवामा मध्ये शहिद झालेल्या शहिदांच्या टाळूवरचे लोणी भाजप खाते आहे अशी टीका ही शिवसेनेकडून करण्यात आलीय...अयोध्येत राममंदिर झाल्या शिवाय पुढे चर्चा नाही शेतकऱ्यांना मदत झाल्याशिवाय भाजप सोबत चर्चा नाही असे उद्धव ठाकरे म्हणत होते तरी ही युती होते आहे तेव्हा उद्धव ठाकरे यांना काय चिरीमिरी मिळालीय ते महाराष्ट्राच्या जनतेला कळलं पाहिजे असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले....एकीकडे शिवसेनेनं अनेक आरोप शेलकी टीका करून ही पार्टी विथ डिफ्रन्स म्हणवणाऱ्या भाजपने युतीसाठी स्वाभिमान गहाण ठेवला आहे अशी टीका देखील विखे पाटील यांनी केलीय

Byte राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्ष नेतेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.