ETV Bharat / state

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला नागरिकांची गर्दी - धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यासाठी अनेक जण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.

पुणे
पुणे
author img

By

Published : Nov 13, 2020, 4:55 PM IST

पुणे - दसऱ्याचा मुहूर्त साधल्यानंतर आता धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी पुन्हा एकदा सोने चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी केली. दिवाळीच्या सणामध्ये सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सोन्या-चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यासाठी अनेक जण दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पुणेकरांनी सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदीला नागरिकांची गर्दी
सोन्यापेक्षा चांदीला जास्त मागणीधनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदीची नाणी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळेच पुण्यातील सुप्रसिद्ध अशा रांका ज्वेलर्समध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करीत ग्राहकांनी सोने-चांदी खरेदी केली. कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या त्रयोदशीच्या तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी 13 नोव्हेंबर म्हणजेच आज धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. धनत्रयोदशीचा दिवस हा धन्वंतरी त्रयोदशी म्हणूनही ओळखला जातो या दिवशी कोणतीही वस्तू, सामान किंवा संपत्ती खरेदी केल्यास त्याला धनाच्या देवतेचा आशीर्वाद लाभतो. या दिवशी आयुर्वेदाची देवता धन्वंतरीचीही पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची आणि गणपतीची मूर्ती खरेदी करून दिवाळीच्या दिवशी त्याची पूजा केली जाते. त्यामुळे आज चांदीच्या देवी लक्ष्मीची नाणेही जास्त प्रमाणात ग्राहक घेत आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ग्राहक सोन्यापेक्षा जास्त चांदीची मागणी करत आहेत. अशी माहिती रांका ज्वेलर्सचे डायरेक्टर वस्तूपाल रांका यांनी दिली.मागच्या वर्षीपेक्षा यंदा सोने-चांदीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ मागच्या वर्षी चांदीची किंमत 40 हजार रुपये किलो होती. आज चांदीच दर हे 63 हजार रुपये किलो आहे. तर सोन्याचा भाव हा मागच्या वर्षी 37 हजार रुपये प्रतितोळा होता, तो आज 53 हजारांपर्यंत पोहचला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोने-चांदीच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती ही वास्तूपाल रांका यांनी दिली.मागच्या वर्षीपेक्षा यंदा खरेदी कमी दरवर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे नागरिक कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. मात्र, जी खरेदी करण्याची परंपरा आहे ती परंपरा नागरिक पूर्ण करत आहे. आपल्याकडे दागिने घेतले म्हणजे शुद्ध सोने खरेदी केले असे मानले जाते, म्हणून दागिन्यांच्या खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.