पुणे -पोलिसांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील 'रेड लाईट' एरियात कोंबिंग ऑपरेशन राबववत तरूणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या ९ घरमालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत १८ तरुणींची वेश्याव्यवसायाच्या दुष्टचक्रातून सुटका करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार पेठेतकाही तरुणींना डांबून ठेवत त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांना मिळाली होती. त्यानुसार १५ पोलीस अधिकारी आणि७० कर्मचाऱ्यांच्या पथकाने बुधवार पेठ परिसरात कोम्बिंग ऑपरेशन राबवविले. या कारवाईदरम्यान १८ तरुणींची सुटका करण्यात आली. त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या ९ घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुटका करण्यात आलेल्या १८ तरुणींना महामंडवादी येथील रेस्क्यू होममध्ये पाठविण्यात आले आहे.