ETV Bharat / state

महाराष्ट्रात डॉक्टर मिळेना! पुणे झेडपीची दक्षिण भारतात जाहिरात - पुणे झेडपी दक्षिण भारत डॉक्टर जाहिरात

कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांती डॉक्टरांची व नर्सेसची पदे रिक्त आहेत. जाहिरात देऊनही महाराष्ट्रात डॉक्टर मिळेनासे झाले आहेत. पुणे महानगरपालिकेने तर आता दक्षिण भारतातील राज्यांत जाहिरात देण्याचे ठरवले आहे.

Doctor
डॉक्टर
author img

By

Published : Sep 30, 2020, 1:19 PM IST

पुणे - महाराष्ट्रात डॉक्टर मिळेना म्हणून पुणे जिल्हा परिषदेने आता दक्षिण भारतातील राज्यांत जाहिरात देण्याचे ठरवले आहे. पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत या रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी संख्या पुण्यात नाही. ग्रामीण रुग्णालयांतील अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्यावतीने यापूर्वी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर भरतीसाठी तीन वेळा जाहिरातही दिली. मात्र, महाराष्ट्रातून त्याला पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर भरतीसाठी महाराष्ट्रात तीनदा जाहिरात दिली. ग्रामीण रुग्णालयातील 1 हजार 774 पदे रिक्त होती. या जाहिरातीनंतर 1 हजार 192 पदांची भरती करण्यात आली. मात्र, वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफच्या काही जागा अद्यापही शिल्लक आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सुविधा देण्यावर होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जाहिरात देऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा शिल्लक राहिल्यामुळे जिल्हा परिषदेने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या दाक्षिणात्य राज्यांत जाहिरात देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या राज्यांतून वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफची पदे भरून ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था भक्कम करणार असल्याचे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.