ETV Bharat / state

पुण्यातील अजब-गजब प्रकरण; 'मिठू-मिठू दे अन् घटस्फोट घे', आफ्रिकन पोपटावरुन रंगला घटस्फोटाचा वाद

Pune Strange Divorce Case : 'पुणे तिथे काय उणे' ही म्हण आपण नेहमी ऐकत असतो आणि याची प्रचितीही आपल्याला वेळोवेळी विविध माध्यमातून येतच असते. अशीच काही अजब-गजब घटना पुण्यात घडली आहे. पती-पत्नीमधील वाद झाल्यानंतर काहीजण एकमेकांना समजून घेतात, तर काहीजण कोर्टाची पायरी चढतात. परंतु पुण्यात घटस्फोटाची अशी घटना समोर आलीय की ती ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

pune strange divorce case husband demand return african parrot for divorce to wife
आफ्रिकन पोपट परत दिला तरच तुला घटस्फोट देईन; पुण्यातील अजब-गजब प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 2:17 PM IST

पुण्यात आफ्रिकन पोपटावरुन रंगला घटस्फोटाचा वाद

पुणे Pune Strange Divorce Case : पुण्यातील एका पतीनं आपल्या पत्नीकडून घटस्फोट मिळवून घेण्यासाठी थेट पत्नीला लग्नाच्या आधी भेट म्हणून दिलेल्या आफ्रिकन ग्रे पॅरेट पोपट परत देण्याची मागणी केली. जवळपास तीन वर्ष या ग्रे पॅरेट पोपटासाठी पती पत्नीत वाद सुरू होता. अखेर पत्नीनं पोपट देण्यास होकार दिल्यानंतर हा घटस्फोट घेण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण : लग्नाअगोदर पतीनं आपल्या होणाऱ्या पत्नीला आफ्रिकन पोपट भेट दिला होता. 2019 मध्ये त्यांचं लग्न झालं. मात्र, लग्नानंतर सारखे वाद होऊ लागल्यानं दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. तसंच घटस्फोटासाठी दोघांनीही पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये अर्ज केला. मात्र, यावेळी 'मी दिलेला आफ्रिकन पोपट परत दिला तरच तुला घटस्फोट देईन', असं पती म्हणाला. पण पत्नीनं त्यासाठी नकार दिला. पती आणि पत्नीचा हा वाद तब्बल 3 वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू होता.

अखेर घटस्फोट झाला : यासंदर्भात अधिक माहिती देत वकील भाग्यश्री गुजर म्हणाल्या की, अनेकदा नवरा बायको हे मुलांसाठी, पोटगीसाठी भांडत असतात. पण माझ्याकडं आलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात नवरा बायको हे चक्क एका 'ग्रे पॅरेट' साठी भांडत होते. लग्नापूर्वी पतीनं पत्नीला आफ्रिकन पोपट गिफ्ट दिला होता. लग्नाच्या काही महिन्यानंतर दोघांमधील वाद वाढत जात असल्यानं पत्नीनं घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला. दोघंही घटस्फोट द्यायला तयार होते. पण घटस्फोटापूर्वी पतीनं पत्नीला दिलेल्या आफ्रिकन पोपटाची मागणी केली. हे प्रकरण जवळपास 3 वर्षांपासून कौटुंबिक न्यायालयामध्ये सुरू होतं. अखेर पत्नीनं पोपट देण्यासाठी होकार दिल्यानंतर हे प्रकरण मिटलं असून घटस्फोट झाला आहे.

हेही वाचा -

  1. Husband Settlement In Gwalior : अन् झाली चक्क नवऱ्याची वाटणी! 3-3 दिवस दोन्ही पत्नींसोबत राहणार!
  2. Man Beaten in court : घटस्फोटानंतर पत्नीच्या कुटुंबीयांनी केली पतीस कोर्टात मारहाण, पाहा व्हिडिओ
  3. High Court On Divorce : पत्नी मानसिक आजारी असल्याचा दावा, नवऱ्यानं मागितलेला घटस्फोट नागपूर खंडपीठानं फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.