ETV Bharat / state

पुणे-सोलापूर महामार्ग: पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी - पाटस टोलनाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

Pune-solapur Highway
पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी
author img

By

Published : Jan 16, 2020, 1:33 PM IST

पुणे - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस टोलनाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांची २ किलोमीटर तर पुण्याकडून येणाऱ्या वाहनांची पाटस गावातील ब्रीजपर्यंत रांग लागली होती.

पाटस येथील टोल नाक्यावर शासन नियमानुसार रोख रकमेसाठी स्वतंत्र लेन आणि फास्टटॅगसाठी स्वतंत्र लेनची व्यवस्था करण्यात आली आहे. रोख रकमेसाठी दोन्ही बाजूला एक-एक लेन ठेवण्यात आली आहे. तर इतर सर्व लेन फास्टटॅगसाठी ठेवण्यात आल्या. फास्टटॅग नसणारे वाहन जर फास्टटॅगच्या लेनमध्ये गेले तर त्या वाहनाला शासन नियमानुसार वाहनाला दुप्पट टोल द्यावा लागत आहे. दुप्पट रकमेची पावती त्या वाहन चालकांना दिली जात आहे.

पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

फास्टॅग नसणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने , रोख रकमेच्या लेनवर जास्त वाहने झाल्यामुळे पाटस टोल नाक्यावर वाहतूक कोंडी झाली. पाटस टोल नाक्याजवळूनचा मार्ग दौंडकडे जातो. या मार्गाला वाहने आडवी असल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली. दौंडकडून येणाऱ्या आणि दौंडकडे जाणारी वाहने बराच वेळ अडकून पडली. वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वाहने विरुद्ध दिशेने टोल नाक्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते.

पाटस येथील टोल नाक्यापासून पुढे बारामती फाटा आहे. या फाट्यावर वाहने उभी असल्याने बारामतीकडे जाणारी वाहने आणि बारामती बाजूकडून पाटस बाजूकडे येणारी वाहने वाहतूक कोंडीत अडकली. वाहनचालकांना मोठा त्रास यामुळे सहन करावा लागत आहे. पाटस टोल नाक्यावरील सर्व्हिस रोड आणि पुणे बाजूकडील दुचाकीच्या मार्गावर चारचाकी वाहने असल्याने दुचाकीस्वरांना जायला मार्ग राहिला नसल्याची स्थिती निर्माण झाली.

Intro:Body:पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोल नाक्यावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी

दौंड

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील पाटस येथील टोल नाक्यावर आज सलग दुसऱ्या दिवशीही सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या . या रांगांमुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला .
महामार्गावरील वाहतुक वीस्कळित झाल्याचे चित्र दिसत होते . सोलापूर बाजूकडून येणाऱ्या वाहनांची दोन किलोमीटर तर पुणे बाजूकडून येणारी वाहने पाटस गावातील ब्रीज पर्यंत रांग लागली होती .

पाटस येथील टोल नाक्यावर शासन नियमानुसार रोख रक्कमेसाठी स्वतंत्र लेन आणि फास्टटॅग साठी स्वतंत्र लेन ची व्यवस्था करण्यात आली आहे . रोख रक्कमेसाठी दोन्ही बाजूला एक - एक लेन ठेवण्यात आली . तर इतर सर्व लेन फास्टटॅग साठी ठेवण्यात आल्या .फास्टटॅग नसणारे वाहन जर फास्टटॅग च्या लेन मध्ये गेले तर त्या वाहनाला शासन नियमानुसार त्या वाहनाला दुप्पट टोल द्यावा लागत आहे . दुप्पट रक्कमेची पावती त्या वाहन चालकांना दिली जात आहे .
फास्टटॅग नसणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने , रोख रक्कमेच्या लेन वर जास्त वाहने झाली असल्याने वाहतूक कोंडी ची समस्या पाटस येथील टोल नाक्यावर निर्माण झाली असल्याची माहिती मिळाली .

पाटस टोल नाक्याजवळून दौंड कडे जाणारा मार्ग जातो . या मार्गाला वाहने आडवी असल्याने वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली . दौंड कडून येणाऱ्या आणि दौंड कडे जाणाऱ्या वाहने बराच वेळ अडकून पडली . वाहतूक विस्कळीत झाली होती . काही वाहने विरुद्ध दिशेने टोल नाक्यावरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसत होते .
तसेच पाटस येथील टोल नाक्यापासून पुढे बारामती फाटा आहे . या बारामती फाट्यावर महामार्गावर वाहने उभी असल्याने बारामती कडे जाणारी वाहने आणि बारामती बाजूकडून पाटस बाजूकडे येणारी वाहने वाहतुक कोंडीत अडकली . वाहनचालकांना मोठा त्रास यामुळे सहन करावा लागत आहे .

पाटस टोल नाक्यावरील सर्व्हिस रोड आणि पुणे बाजूकडील दुचाकी च्या मार्गावर चारचाकी वाहने असल्याने दुचाकी स्वारांना जायला मार्ग राहिला नसल्याची स्थिती निर्माण झाली . दुचाकी स्वारांना धोकादायक रीतीने , जीव धोक्यात घालून चारचाकी वाहनांतुन मार्ग काढत टोलनाक्यावरून जावे लागत असल्याचे चित्र आज दिसत होते .

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.