ETV Bharat / state

पुणे ग्रामीण पोलिसांकडून वाड्या-वस्त्यांवर अन्नवाटप - पोलिसांतील माणुसकी

पुणे ग्रामीण पोलिसांकडून जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या गरजुंना मोफत अन्नधान्य पुरवठा केला जात आहे.

pune rural police
मदत करताना पुणे पोलीस
author img

By

Published : May 14, 2020, 5:38 PM IST

Updated : May 14, 2020, 9:06 PM IST

पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या सर्व मजुरवर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाविरोधातील युद्धात वैद्यकीय, सफाई कर्मचाऱ्यांसह पोलीस कर्मचारीही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोना विरोधातील युद्धात लढा देताना पोलिसांकडून माणुसकीही जपली जात आहे. पुण्यातील जेजुरीजवळ असलेल्या पारधी वस्तीत पुणे ग्रामीण पोलिसांनी फुड पॅकेट्सचे वाटप केले.

मदत करताना पुणे पोलीस

जिल्ह्यातील विविध भागात वाड्या, वस्त्यांवर राहणाऱ्यांकडे, विविध ठिकाणी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. अशा लोकांवर टाळेबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस प्रशासन माणुसकी जपत ग्रामीण पोलीस विभागात येणाऱ्या विविध गावांतील वाड्या, वस्त्यांवर जाऊन गरजुंना मोफत अन्न धान्य देत आहेत. पोलिसांच्या या कार्यामुळे खाकीताील माणुसकीचे दर्शन होत आहे.

बोलताना पोलीस अधिक्षक संदीप पाटील

हेही वाचा - हुक्क्याची होमडिलिव्हरी करणाऱ्या तिघांना पुण्यात अटक

Last Updated : May 14, 2020, 9:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.