पुणे - कोरोनाच्या काळात पुणे पोलिसांनी एक अभिनव उपक्रम केला. त्यांनी कोंढव्यातील शब ए कद्र या कब्रस्तानमध्ये जाऊन मृतांच्या कब्रवर फुले अर्पण करून प्रार्थना केली. शब ए कद्र म्हणजे पवित्र रमजान महिन्याची मोठी रात्र असते. या रात्री मुस्लीम बांधव कब्रस्तानमध्ये जाऊन कब्रवर फुल अर्पण करतात.
रमजान महिन्यात 26व्या रोजा दिवशी शब ए कद्र असते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात फुले अर्पण करून प्रार्थना करण्यात आली. कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाला हा उपक्रम राबवला. शब ए कद्रच्या रात्री मुस्लिम बांधव कब्रस्तान मध्ये जाऊन कब्रवर फुल अर्पण करतात. परंतू, मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिन्यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आहेत.