पुणे- गुटखा व तंबाखूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून जवळपास ३ हजार ८६१ किलो गुटखा तर तंबाखुची २५ पोते जप्त करण्यात आली आहेत. हा माल ५६ लाखांचा असल्याचे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने सांगितले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, राज्यात गुटखा, पानमसाला तसेच तंबाखूचे उत्पादन, साठवण अथवा वाहतूक करण्यास बंदी आहे. अशी बंदी असतानादेखील आरोपी ५६ लाख ४८ हजार किमतीच्या गुटख्याची वाहतूक करत होता.
पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा येथे २२ जानेवारीला रात्री १०.३० च्या सुमारास आरोपी प्रवीण दुर्योधन जाधव याला अटक करण्यात आली. त्याचबरोबर आरोपीने या वाहतुकीसाठी वापरलेला ट्रकदेखील पुणे पोलीसांनी जप्त केला आहे.
पुणे पोलिसांच्या युनिट ६ च्या हद्दीत गस्त घालत असताना ४ हजार किलो वजनाचा विमल गुटखा त्याचबरोबर तंबाखूची २५ पोते आणि वाहतुकीसाठी वापरलेला ट्रक हा जप्त करण्यात आला. आरोपीवर लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये कलम १८८,२७२, २७३,३२८,३४ तसेच अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती युनिट ६ चे पोलीस निरीक्षक गणेश माने आणि सह्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.
पुणे- सोलापूर महामार्गावर ३ हजार किलोच्या वर गुटखा तर २५ पोते तंबाखू जप्त, पुणे पोलिसांची कारवाई - पुणे पोलिस कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी ( pune police action ) दिलेल्या अधिक माहितीनुसार राज्यात गुटखा, पानमसाला तसेच तंबाखूचे उत्पादन , साठवण अथवा वाहतूक करण्यास बंदी आहे. अशी बंदी असताना देखील आरोपी ५६ लाख ४८ हजार किमतीच्या गुटख्याची ( pune police seized tobacco gatka ) वाहतूक करत होता.