पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशाच्या पोलिसांना गुंगारा देऊ पळून जाणारा, कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड ( Notorious international gangster ) चार्ल्स शोभराज ( Charles Sobraj ) नेपाळमधून सुटत आहे. परंतु याच कुख्यात गुंडाला एका मराठी अधिकाऱ्याने धाडसाने दोनदा पकडून जेरबंद ( Caught and imprisoned twice ) केले होते. पोलीस अधिकारी मधुकर झेंडे ( pune police officer Madhukar zende ) असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नेमका हा चार्ल्स शोभराज आणि त्याचे विश्व कसे होते. ( thrilling experience of arresting Serial killer )
त्याला कसे पकडले : चार्ल्स शोभराज हा भारतीय नाही. तो भारतामध्ये बाहेर देशाच्या चोरी करून विदेशी गाड्या आणून विकायचा. त्यामुळे तो खूप हुशार गुंड होता. मधुकर झेंडे सांगतात, की पहिल्यांदा तो दिल्ली पोलिसांच्या हाती लागला होता, दिल्लीत त्याने रॉबरी केली होती, ते पैसे देण्यासाठी मुंबईमध्ये आला होता, मधुकर झेंडे यांना खबऱ्यामार्फत ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी अतिशय शिताफीने त्याला पकडले. त्याला दिल्ली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. त्यानंतर तो दिल्लीच्या जेलमध्ये असताना माझा वाढदिवस आहे असे म्हणून एका मित्राला केक घेऊन तुरुंगात आला. तो केक सर्वांना खाऊ घातला आणि 16 लोक तीन गाड्या मधून तिहार तुरुंगातून पळून गेले.
अनेक पोलिसांना दिला गुंगारा : चार्ल्स शोभराज हा गुंगारा देण्यात खूप प्रसिद्ध आहे आणि त्याची खून करण्याची पद्धतही प्रसिद्ध आहे. तो वेगवेगळ्या महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, त्यांना खायचे गुंगीत औषध द्यायचा. समुद्रकिनारी न्यायचा गाडीतले पेट्रोल घालायचा आणि जाळून द्यायचा अशा प्रकारचा हा अतिशय भयानक गुंड आणि तो देशभरातल्या विदेशातल्या अनेक पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यास त्याची चालखी होती. त्यानंतर हा गुंड मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. तत्कालीन महासंचालकाने एका पेपरमध्ये बातमी आली की, या व्यक्तीला एक मराठी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे हे ओळखतात त्याने त्यांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की त्याला तुला पकडायचे आहे.
हाय प्रोफाईल गुंड : चार्ल्स शोभराज हा गोव्यामार्गे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी अमेरिकेला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गोव्याला मधुकर झेंडे हे तपासासाठी गेले. त्या ठिकाणी त्यांनी तपास केला. त्या तपासातल्या ज्या काही रंजकता आहेत त्याने त्या सांगितल्या. त्याने माझा भाऊ हरवलाय असे त्या ठिकाणी सांगायचे परंतु हा गुंड इतका हाय प्रोफाईल होता त्याच्याकडे वेगवेगळ्या देश विदेशातल्या गाड्या होत्या. तो वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये राहायचा. त्याचे कनेक्शन ही मोठे होते. त्यामुळे तो जर्मन माणूस आहे आणि तुम्ही काळे आहात. असे तिथला एक लहान मुलगा मला म्हणाला असेही मधुकर झेंडे सांगतात.
दिल्ली पोलिसांच्या हवाली केले : त्यानंतर एका हॉटेलमध्ये तो येणार असल्याची खबर त्यांना मिळाली. त्या ठिकाणी दोन-तीन दिवस ते तपास केले. ज्या वेळेस तो आला त्यावेळेस संध्याकाळी तो हॉटेलमध्ये आला, त्यावेळी त्याने डोक्यावर टोपी घातली ऊन नसताना टोपी का ? घातली म्हणून तेथे दबा धरून बसलेले मधुकर झेंडे आणि इतर अधिकारी तसेच थांबले. त्यांनी ते काय करतात हे बघितले. मग पूर्ण प्लॅनिंग करून त्याच्यावरती झडप टाकली आणि त्यावेळेस सोबराज म्हणाला, कोण शोबराज परंतु मधुकर झेंडे यांना सोबराज माहीत होता. त्यामुळे त्यांनी पक्क ओळखले आणि त्याने सांगितले की मी तुला पकडले, मी तुला ओळखणारच, तिथून घेऊन त्याला परत मुंबईला मुंबईहून दिल्लीला आणण्यात आले. तो ब्लॅक बेल्ट होता. त्यामुळे तो खूप हुशार आणि चणक्ष गुन्हेगार असल्यामुळे त्याला सुतुळी दोरी बाइंडिंग आणि त्यांच्या ज्या काही वायर्स असतात. त्याने बांधून त्यावरती दोन पोलीस हवालदार बसून, त्यांच्या हातात बॉटल देऊन लघवी आली तर त्यात करण्यात यावी अशी सगळी रचना करून त्याला पकडून त्याने दिल्ली पोलिसांच्या हवाली केले.
मराठी अधिकारी निधड्या छातीने पुढे गेला : एवढ्या कुख्यात गुंडाला पकडताना एक मराठी अधिकारी निधड्या छातीने पुढे गेला. त्यानंतर त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. त्या वेळेचे तत्कालीन गृहमंत्री, तत्कालीन पोलीस महासंचालक, गृह विभागाचे मोठे मोठे अधिकाऱ्याने त्यांच्या सत्कार केला. पाच भारतरत्न आणि त्यांचा सत्कार केला. स्वतः लता मंगेशकर यांनी सुद्धा या अधिकाऱ्यांचा सत्कार केला. तेवढेच काम त्यांनी बाबरी मज्जित पडल्यानंतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांचे घर वाचवण्यासाठी सुद्धा केले. त्यामुळे एक कर्तव्यदक्ष मराठी अधिकाऱ्याने एका कुख्यात गुंडाला आंतरराष्ट्रीय पकडून दिले. ज्या गुंडाला फ्रान्स फ्रेंच अमेरिका असे वेगवेगळ्या देशातले पोलीस पकडत होते पण गुंगारा देऊन पळत होता. त्याला अतिशय सिद्धांत पकडण्याचा पराक्रम या पोलीस अधिकाऱ्याने केलेला आहे. चार्ल्स शोभराज कुख्यात गुंडाची नेपाळ मधुन सुटका झाली आहे. जगभरात 42 महिलेची हत्या करणाऱ्या आणि जगभरात पोलिसाने गुंगारा देणारे चार्ल्स शोभराज यांना दोनदा पकडुन देणारे धाडशी पोलीस अधिकार मधुकर झेंडे यांचीही कहानी चित्रपटासारखीच आहे.