पुणे: अरबाज आयुब पटेलच्या गुन्हेगारीमुळे परिसरातील सार्वजनिक व्यवस्थेत मोठी अडचण येत असे त्याची दहशत इतकी होती की, आपली जिवीत किंवा मालमत्तेची हानी होईल म्हणून परिसरातील रहिवाशी त्याच्याविरोधात तक्रार करत नव्हते अशा अनेक बाबी लक्षात घेत पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आरोपीच्या विरोधात १ वर्षाकरिता स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले आहेत. पोलीस आयुक्त गुप्ता यांनी पुण्यात दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे, त्यानुसार गेल्या एका वर्षात त्यांनी ५३ अट्टल गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.
Criminal Intern : पुणे पोलिसांनी आणखी एका सराईत गुन्हेगाराला केले स्थानबद्ध
विमानतळ परीसरातील गुन्हेगार (Criminals in the airport area) अरबाज आयुब पटेल (Arbaaz Ayub Patel) वय २३ वर्षे याच्यावर पोलीसांनी स्थानबद्धतेची कारवाई (Intern action) करण्यात आली आहे. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याने अनेकदा त्याच्या साथीदारासह कोयता, तलवार अशा जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न तसेच नागरिकांना गंभीर दुखापत करणे त्याचबरोबर दंगा करणे, यासारखे अनेक गंभीर गुन्हे केले आहेत. (committed serious crimes) गेल्या ५ वर्षात त्याच्याविरोधात ०५ गुन्हे दाखल आहेत.