ETV Bharat / state

Car Racing Championship : बापासाठी लेक झाली चॅम्पियन; पुण्याच्या निकिताचा कार रेसिंगमध्ये डंका - नितीन टकले

Car Racing Championship : अनेक कर्तृत्ववान महिलांच्या संघर्ष आणि त्यांच्या यशस्वी कारकीर्द आपण पहिल्या असतील. पण पुण्यातील हडपसर येथे राहणारी 23 वर्षीय निकिता टकले (Nikita Takle) ही आपल्या बापासाठी कार रेसिंगमध्ये चॅम्पियन झाली असून, ती भारतातील 'पहिली महिला कार रेसिंग चॅम्पियन' ठरली (Woman Champion In Car Racing) आहे.

Nikita Takle Car Racing
कार रेसिंगमध्ये पहिली महिला चॅम्पियन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 8:00 PM IST

Updated : Nov 6, 2023, 10:19 PM IST

'ईटीव्ही भारत'चा स्पेशल रिपोर्ट

पुणे Car Racing Championship : आजच्या युगात महिला कोणत्याही बाबतीत पुरुषांपेक्षा कमी नाहीत. घर असो किंवा कामाची जागा, आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. असं कोणतंही क्षेत्र नाही जिथं महिलांचं योगदान नाही. सर्वच क्षेत्रात महिला आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. असं म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण पुण्यातल्या निकिता टकलेच्याबाबत (Nikita Takle) उलट घडलंय. तिचे वडील तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचं दिसतं. 23 वर्षीय निकिता ही कार रेसिंगमध्ये पहिली महिला चॅम्पियन ठरली (Woman Champion In Car Racing) आहे. त्यासाठी वडिलांचं मार्गदर्श तिला लाभलं. वडील नितीन टकले यांनी निकिताला अक्षरशः घडवलं. तसंच कायमच तिला खेळात प्रोत्साहन दिलं.

विविध खेळात सहभागी : पुण्यातील शेवाळवाडी जवळ असलेल्या टकले नगर येथे राहणाऱ्या, नितीन टकले यांची एकुलती एक मुलगी निकिता. लहानपणापासूनच ती विविध खेळात भाग घेत होती. वडील नितीन टकले यांनी सर्वसाधारण मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला नाही. तिच्यात नेहमीच स्पेशल शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एखादा असा खेळ ज्याच्यात निकितानंही स्वतःला सिद्ध करावं, त्यामध्ये तिनं करिअर करावं असं त्यांना वाटायचं. पण निकिता तर लहानपणापासून मिळेल त्या खेळात सहभागी होत होती.

असा घडला प्रवास : आईची इच्छा होती मुलीनं कराटेमध्ये करिअर करावं तर वडिलांचं इच्छा होती की तिनं एखाद्या वेगळ्या स्पोर्ट्समध्ये जावं. खराडी येथे कार रेसिंग स्पर्धेचं निमंत्रण वडिलांना मिळालं होतं. स्पर्धा बघायला वडील निकिताला घेऊन गेले होते. तिथं स्पर्धेत सहज भाग घ्यायला वडिलांनी निकिताला सांगितलं. त्या स्पर्धेत तिला एक दोन नव्हे तर जवळपास 9 ट्रॉफी मिळाल्या. वडिलांना तेव्हाच वाटलं की, आपल्या मुलीनं या क्षेत्रात करिअर करावं. वडिलांनी सांगितलं म्हणून निकितानंही लगेच होकार दिला. बेंगलोरला जाऊन गुरू चेतन शिवराम यांच्या हाताखाली कार रेसिंगचं निकितानं प्रशिक्षण घेतलं. आज पाहता-पाहता दोन वर्षातच ती देशातील पहिली चॅम्पियन रेसर म्हणून समोर आली आहे.

Car Racing Championship
निकिता बनलीय कार रेसिंगमध्ये पहिली महिला चॅम्पियन

निकिताने मिळविली अनेक पारितोषिके : या दोन वर्षाच्या काळात देशभरातील तसंच जगातील विविध स्पर्धेत निकितानं सहभाग घेतला. या काळात तिनं 65 ट्रॉफी जिंकल्या आहेत. आता ती महिला चॅम्पियन असून या महिन्यातच कुर्ग कर्नाटक व त्याच्यानंतर बंगळुरूमधल्या स्पर्धात सहभाग घेणार आहे. ही स्पर्धा औपचारिक असून ती आता चॅम्पियन म्हणून पुढे आली आहे.

यांनी केलं मार्गदर्शन : विविध ठिकाणी अतिशय खडतर आणि चुरशीच्या या ऑटो क्रॉस स्पर्धेत निकितानं सहभाग घेतला. तिच्याबरोबर पहिल्यापासून तिचे आई-वडील हे सोबत राहिले. अंगावर शहारे आणणाऱ्या अनेक आठवणी निकिताच्या आईनं सांगितल्या. देशात व परदेशात अनेक स्पर्धेत सहभागी होत असताना तिला दडपण आलं होतं. मात्र गुरू चेतन शिवराम, निकिताचे वडील उद्योजक नितीन टकले, तसंच आईनं निकिताला मार्गदर्शन केलं.

हेही वाचा -

  1. World Archery Championships : शाळा-कॉलेजच्या वयात सातारची आदिती स्वामी तिरंदाजीत बनली वर्ल्ड चॅम्पियन, जाणून घ्या तिचा सुवर्णमय प्रवास...
  2. National Archer Selling Tea: धनुष्य तुटले अन् तिचे स्वप्नच भंगले.. राष्ट्रीय चॅम्पियन खेळाडू विकत आहे चहा..
  3. World Archery Championship: भारताचा 'सुवर्ण' नेम; साताऱ्याची लेक अदिती 17 व्या वर्षीच बनली जागतिक चॅम्पियन, पंतप्रधानांकडून कौतुक

Last Updated : Nov 6, 2023, 10:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.