पुणे - आगामी विधानसेभेसाठी सर्वच पक्षांकडून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी, शिरुर, आंबेगाव, जुन्नर या चार विधानसभा मतदारसंघासाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी देवाची आळंदी येथे होणार आहेत.
राज्यमंत्री आणि भाजपचे पक्ष निरीक्षक रविंद्र चव्हाण उत्तर पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी दुपारी खेड-आळंदी, शिरुर, आंबेगाव, जुन्नर या चारही विधानसभा मतदारसंघात पक्षाकडून इच्छुक असणाऱ्यांच्या मुलाखती होणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमांतून भाजपकडून उत्तर पुणे जिल्ह्यातील उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे. येथील चार मतदारसंघांपैकी शिरुर विधानसभा मतदार संघावर भाजपचा आमदार आहे. तर खेड-आळंदी विधानसभा मतदार संघावर भाजपची पकड वाढली आहे. दरम्यान, भाजप शिवसेना युती असतानाही भाजपकडून सर्वच विधानसभा मतदार संघात चाचपणी सुरू असल्याने भाजप स्वतंत्र लढणार की युती होणार, अशी चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.