पुणे Pune Murder News : पुण्यातील खेड तालुक्यातील एक 19 वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा तरुणांच्या डोक्यात दगडानं वार करुन मृतदेह जंगलात फेकून दिल्याचं आढळून आलं होत. या हत्येच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस तपास करत होते. मात्र आपण पकडले जाण्याच्या भितीनं स्वतःचं अस्तित्व लपवत मुंबईत किन्नर बनून राहणाऱ्या आरोपीचा शोध घेवून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बेड्या ठोकल्या आहेत. कर्जबाजारी झाल्यानं पैशांसाठी हा खून केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सचिन यादव अस खून झालेल्या तरुणाच नाव आहे.
बेपत्ता झाल्याची तक्रार : सचिन यादव हा 24 सप्टेंबर रोजी घरातून कामनिमित्त गेला तो घरी परतलाच नाही. दोन तीन दिवस त्याचा शोध घेतल्यानंतरही तो मिळून आला नाही त्यामुळं त्याचे वडील हरिराम यादव यांनी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात सचिन बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच म्हाळुंगे पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने देखील या प्रकरणाचा तपास सुरू केला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी मिसिंग मुलाच्या बाबतीत सर्व माहिती संकलित केली. तेव्हा मिसिंग सचिन हा एम.आय.डी.सी. परीसरात दोन अनोळखी इसमासोबत असल्याचे सीसीटिव्ही फूटेजमध्ये दिसून आले.
ताब्यात घेत चौकशी - पोलीस तपासांत यातील एका तरुणाचं नाव रोहित नागवसे असल्याचं समोर आलं. मात्र, तोही गायब असल्याची माहिती तपास पथकाच्या हाती लागली. पोलीसांनी सीसीटीव्ही मधील दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू केला. त्यात सचिन सोबत असलेला दुसरा इसम गोरख फल्ले असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा पथकाच्या तपासाला गती आली. पथकानं गोरख फल्लेला ताब्यात घेत चौकशी सुरू केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच गोरख फल्लेनं घडलेल्या घटनेची पोलिसांना हकिकत सांगितली.
आरोपी व मृत जुने मित्र : रोहित आणि सचिन हे पूर्वीचे मित्र असल्याचं गोरखनं पोलीस तपासात सांगितलंय. 24 सप्टेंबर रोजी गोरख फल्ले आणि रोहित नागवसे यांनी सचिनला निमगाव परीसरात देवदर्शनाला जावुन तेथील जंगलात दारू पाजुन दगडाने त्याचा खुन केला होता. हत्या केल्यानंतर गोरख पल्ली हा आपल्या गावी बीड जिल्ह्याला निघून गेला. तर त्याचा साथीदार रोहित नागवसे याला मुंबईत किन्नर बनण्यासाठी एका तृतीयपंथीकडं पाठवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी रोहित नागवसे याचा शोध सुरू केला असता पोलिसांना रोहित मुंबईच्या विरारमध्ये तृतीयपंथी म्हणून राहत असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. पोसीलांच्या पथकानं मुंबईमध्ये शोध मोहिम राबवत एका घरातील किन्नरकडे चौकशी केली असता त्याने त्याचं नाव गायत्री असं सांगितलं. मात्र, पथकाला संशय आल्यानं त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याचं खरे नाव रोहित नागवस असल्याचं सांगितलं.
पैशांसाठी खून : पैशासाठी यादव कुटुंबीयांना लुटण्याचा प्रयत्नातुन आरोपी गोरख पल्ले आणि रोहितनं सचिनच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलीय. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करत आहेत.
हेहा वाचा :